सदाशिव बंदसोडे यांनी शिक्षकी पेशा हा नोकरी म्हणून न करता ते एक व्रत आहे, या भावनेने सेवा केली .
सेवापूर्ती गौरव समारंभ म्हणजे केलेल्या प्रामाणिक सेवेचा गौरव आहे
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
शिक्षक आजीवन शिक्षक असतो तो कधीही माजी होत नाही, फक्त शासकीय नियमाने तो सेवानिवृत्त होत असतो, केवळ शाब्दिक उपदेशातून नव्हे तर शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थी घडत असतात. मुख्याध्यापक सदाशिव बंदसोडे यांनी स्वतःच्या आदर्श आचरणातून शिक्षण विद्यार्थ्यांना दिले. त्यांचे विद्यार्थी संस्कारातील योगदान हे अलौकिक आहे बंदसोडे सर यांनी धार्मिक शैक्षणिक, राजकीय ,सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला कार्यकर्तृवाचा ठसा उमटविला आहे
शिक्षकी पेशा हा नोकरी म्हणून न करता ते एक व्रत आहे, या भावनेने सेवा केली .
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील उपक्रमशील, निसर्गप्रेमी, उत्तम संघटक, धार्मिक वृत्तीचे मुख्याध्यापक सदाशिव धोंडीबा बंदसोडे यांचा सेवापूर्ती समारंभ लक्ष्मी लॉन्स येथे पार पडला. त्यांनी एकूण 39 वर्षे सेवा केली त्यात मुख्याध्यापक म्हणून 8 वर्ष सेवा बजावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी केके पवार हे होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णाताई फटांगरे, विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन आश्वी गावच्या सरपंच अलकाताई गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, डॉ. दिनकर गायकवाड गोकुळ काळे राजेंद्र काळे, कैलास काळे महेंद्र पेंडभाजे, दिलीप पेंडभाजे केंद्रप्रमुख संजय बोरसे,
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव समारंभ संपन्न झाला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात केके पवार यांनी मुख्याध्यापक सदाशिव बंदसोडे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
एक निसर्गप्रेमी उपक्रमशील शिक्षक, उत्तम व्याख्याते , कुटुंबवत्सल नागरिक, दिलदार मित्र अनेक समाज उपयोगी उपक्रम तसेच धार्मिकतेची आवड असलेल्या बंदसोडे सरांनी आपल्या आजपर्यंतच्या सेवा काळामध्ये उत्तमरित्या बजावलेल्या आहेत. याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच झाला. असे गौरवउद्गार त्यांनी काढले.
विद्या काळे व शारदा पेंडभाजे यांनी आपल्या वडिलांविषयी मनोगत व्यक्त केलं
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ह भ प सचिन महाराज गायकवाड यांनी बंदसोडे सरांचा जीवनपट सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नंदकिशोर राहणे सर, देशमुख सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश बंदसोडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम बंदसोडे नंदकुमार घोडके नंदकुमार जाधव सचिन, समीर भागवत, लोखंडे कार्तिक बंदसोडे विद्या काळे शारदा पेंडभाजे बेबी कहाणे व सर्व बंदसोडे, शिंदे काळे पेंडभाजे बनसोडे घोडके परिवार व आश्वी मित्र परिवार यांनी उत्तम नियोजन केले होते. या कार्यक्रमास मित्रपरिवार जिल्ह्यातील केंद्रप्रमुख शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी वर्ग ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य आजी-माजी विद्यार्थी पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
