दोन दशकानंतर विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या रूपाने जागवल्या विद्यार्थी शिक्षक आठवणी
रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु” विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
नुकताच रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार बू|| ता. राहाता, जि. अहमदनगर येथे सन 2004-05 च्या दहावीच्या विद्यार्थि, विद्यार्थिनी व शिक्षकांचा स्नेह मेळावा पार पडला.यात
दोन दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विद्यार्थी – विद्यार्थिनी अनेक वर्षापासून स्नेहमेळाव्याचे आयोजन करावे यासाठी प्रयत्न करत होते व त्याला यावेळी मुहूर्त मिळाला. ज्या प्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत जाण्याची, मित्रांना भेटण्याची ओढ लागलेली असते तशीच उत्सुकता आणि तळमळ यावेळी सर्वांमध्ये जाणवत होती. विशेष म्हणजे इयत्ता पाचवी ते दहावी च्या सर्व शिक्षकांना प्रदीर्घ कालखंडानंतर भेटण्याची, त्यांना पाहण्याची ओढ देखील सर्वांना दुरदुरून शाळेत घेऊन आली होती. नाशिक, मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी, गुजरात येथून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी स्वीकारले, प्रास्ताविक व मनोगत विद्यार्थी रामेश्वर होन यांनी केले. लाळगे सर, तांबे सर, गोसावी सर,रम सर, गुंजाळ सर, विघावे सर, तुंभारे सर जाधव B.B.जाधवर T. G. सर, जगधणे सर,कोते सर,लहरे सर, गायकवाड सर,घोलप सर, शिंदे S.B. सर, मेढे सौ. राऊत मॅडम आदी शिक्षकांचा फेटा, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देत विद्यार्थ्यांनी सत्कार केला. यावेळी या बॅचची मुले शिक्षकांचा किती आदर आणि सन्मान करतात तसेच त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी कशा आठवणीत ठेवतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही बॅच असे प्रतिपादन रम सर यांनी केले.
विद्यार्थ्यांची प्रगती आणि त्यांचे समाधान हेच शिक्षकांसाठी आभूषण असतात हे सांगताना राम तांबे सरांनी फक्त पैसा कमावून समाधान मिळत नसते ही देखील शिकवण कार्यक्रमात दिली.
आपला संपर्क व आपले काम समाजासाठी कसे उपयोगात आणायचे आणि अविरत एकच ध्येय ते साध्य होई पर्यंत कसे जोपासायचे याचे मार्गदर्शन लहरे सर यांनी केले.क्रीडाशिक्षक लाळगे सरांनी उपस्थित सर्वांना व्यसनाचे दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले व सर्वांना आवाहन केले की समाजातून व्यसनाचा रोग मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघमारे सर यांनी शाळा केवळ फक्त आपल्या पुरती मर्यादित न राहता ती समाजासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी असते तेव्हा शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी तन, मन, धनाने प्रयत्न करावा अशी सूचना केली.
यावेळी सर्वांना वर्गातील त्या बाकावर परत बसण्याचे,20 वर्ष जुन्या मित्रांना भेटण्याचे, बघण्याचे सौभाग्य मिळाले, त्यावेळी कठोर वाटणारे शिक्षक आज मित्राप्रमाणे वागणूक देतात हे अनुभवायास मिळाले. सौभाग्य मिळाले, गेल्या दोन दशकानंतरआजही एकमेकांच्या सुख दुःखात सर्वजण सहभागी आहोत, संपर्कात आहोत, शिक्षकांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत हिच आमचीआजची उपलब्धीआहे.त्याचेच प्रतीक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले.
ज्याप्रमाणे शाळेत असताना वर्गशिक्षक जशी हजेरी घेत त्याच प्रमाणे हजेरी घेण्यात आली, उशीरा आलेल्या मुलांना कान धरून शिक्षा करण्यात आली तांबे सरांनी सर्व विद्यार्थांना एक गृहपाठ करण्यासाठी दिला तो म्हणजे संस्कारी बनण्याचा, त्यांनी सांगितले की जसे तुम्ही 20 वर्षानंतर आपल्या गुरुजंनाना विसरले नाहीतअसेच संस्कार आपल्या मुलांवर करा व आपली आई – वडिलांची, शिक्षकांची, वृद्धांची, राष्ट्राची सेवा करत रहा. सर्व विद्यार्थ्यांनी हा गृहपाठ न चुकता करत राहण्याची मनोमन शपथ घेतली.
ज्या शाळेत पहिल्या दिवशी जातांना रडलो असेल त्याच शाळेत आज 20 वर्षांनी परत आल्यावर डोळे पाणावले होते आणि आजचा स्नेह मेळाव्याचा वेळ संपत आहे हे माहीत होताच अश्रू अनावर होत होते आणि शाळेतून पाय निघत नव्हते.
या दोन दशकानंतरच्या या आठवणींची शिरपुंजी घेऊन आम्ही सर्वांनी जड पावलांनी शाळेचा निरोप घेतला.कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केले तर भरत घुले,सतीश भोसले, अमित काळे,शंकेश जाधव, चेतन विसपुते,राहुल लोंढे, निलेश हुरे,रविंद्र लचके, सौ. स्नेहल पाठक (बिडवे), सौ. ज्योती कुदळे (ठोंबरे) यांनी सिंहाचा वाटा उचलला. तर या कार्यक्रमास रेखा बनकर मनीषा कापसे ज्योती कुदळे स्नेहल पाठक मंगल घोगरे वर्षा जाधव कल्पना कापसे योगिता कोडीलकर भारती खर्डे जयश्री लोखंडे शकुंतला नवाळे हेतल पोकार शीला तारू जयश्री साळुंखे प्रिया सोनवणे वर्षा राऊत सतीश भोसले बाळासाहेब फटांगडे सुदाम फटांगडे अमोल घोगरे भरत घुले रामेश्वर होन निलेश हूरे जालिंदर हिरगळ विकास जगताप किशोर जाधव संकेत जाधव अमित काळे पंकज खर्डे जालिंदर लबडे रवींद्र लचके राहुल लोंढे अमोल लोखंडे चंद्रकांत लोखंडे रवींद्र लोखंडे योगेश मेनगर अमोल नवाळे दीपक नवाळे मिलीनाथ पेरणे विजय पाटील अन्वर पठाण महेश राजभोज विलास राऊत सोपान सदाफुले अविनाश वडीतके चेतन विसपुते योगेश अनाप दत्ता पारधे रवींद्र पानसरे अमोल जाधव दिलीप सदाफुले राहुल पंडित योगेश शेळके राजेंद्र निबे रवींद्र पानसरे मंगेश गायकवाड निलेश बो-हाडे आधी सर्व विद्यार्थी उपस्थित होते
