आज 20 जुन संगमनेर कॉलेजचा वाढदिवस.

 

शंकरराव जोशी यांनी जागेपणी बघीतलेल्या स्वप्नांचे मूर्त रुप म्हणजे संगमनेर कॉलेज. अनेक समविचारी मंडळी एकत्र आली…. लोकांना आवाहन केले. पहिली मोठी देणगी दिली ती लंगर बिडीच्या शंकरराव ठाकुर यांनी. दुर्वे नाना यांनी आवाहन केले आणि अनेक बिडी कामगारांनी, मुंबई सेंट्रल च्या अनेक हमाल मंडळींना यथाशक्ति मदत केली. नगरपालिकेने मोठा हातभार लावला. आधुनिक कर्ण म्हणाव्या अशा प्रल्हाद्सा क्षत्रिय यांनी महामार्गावरची 17 एकर जागा दिली… शंकरराव जोशी, बी.जे खताळ,हिम्मतलाल शाह, भाऊसाहेब धुमाळ, पनालाल लाहोटी यांनी अवघ्या चार महीन्यात घटना लिहिली. पहिले खजिनदार ओंकारनाथजी मालपाणी हे भक्कम पणे संस्थेच्या पाठीशी उभे राहिले. प्राचार्य कौंडिण्य यांनी आपले कौशल्य पणाला लावले आणि एक आगळे वेगळे कॉलेज सुरु झाले. अशोक चौकात पहिले वर्ग सुरु झाले. तो दिवस होता 20 जुन 1961…. आजचाच दिवस. आज देश विदेशात आपल्या कर्तृत्वाचा मोहोर उमटवणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या यशात संगमनेर महाविद्यालयाचा वाटा असल्याचे अभिमानाने सांगतात …. थँक यू संगमनेर कॉलेज.
डॉ संतोष खेडलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!