वाडेकर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत योग दिन साजरा 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडेकर वस्ती या ठिकाणी आज 21 जून 2024 रोजी योग दिन साजरा करण्यात आला त्यावेळी प्राणायाम योगा याची माहिती देण्यात आली जीवनातील योगा आणि प्राणायामाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले यावेळी झांबरे मॅडम आणि रोकडे सर यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून योगा प्राणायाम करून घेतले, सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याकडे चांगल्याच प्रकारे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भाषा नैसर्गिक जीवन याबद्दल देखील माहिती देण्यात येते, विविध उपक्रम राबविले जातात. योगासनामुळे होणारे उपयोग, फायदे यांसारखे माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुनील रोकडे सर आणि झांबरे मॅडम यांनी दिली आहे.
भविष्यात आरोग्यदायी असलेले विद्यार्थी जीवनामध्ये खूप काही करू शकतात अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!