रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल आश्र्वी बुद्रुक विद्यालयामध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा .
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज
आश्र्वी इंग्लिश स्कूल, आश्र्वि बू ता.संगमनेर येथे आज रोजी योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांनी योग दिनाचे विविध प्रात्यक्षिक प्राणायाम व योगासने याचे प्रात्यक्षिक विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाले त्यासाठी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक राजेंद्र शहाणे व प्र. पर्यवेक्षक रमेश थेटे, क्रीडा विभाग प्रमुख आव्हाड व्ही.एल.यांच्या मार्गदर्शनाने सर्वप्रथम विद्यालयाच्या उपशिक्षिका गाडे ए आर यांनी आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून दिले त्याच बरोबर विद्यालयाचे शिक्षक धराडे सी.आर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात प्रात्यक्षिक केले त्यावेळी विद्यालयाचा सर्व शिक्षक,सेवक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता
