उत्कर्षा रूपवते लढवणार विधानसभा ; वंचितच्या तिकिटावर श्रीरामपूरची जागा निश्चित ; पक्षाकडून आणखी एका जबाबदार पदाची शक्यता !
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
शिर्डी लोकसभा मतदार संघात एक सक्षम प्रभावी भाषण शैलीचा पगडा दाखवत आपले नेतृत्व भक्कम करणा-या व मतदार राजावर वक्तव्याची छाप, पारदर्शिता व दूरदर्शिता निर्माण करणारी एक मेकर टेकर तसेच वंचितला पुढे नेणारी “इरा ऑफ दि वूमेन” म्हणून उत्कर्षा रूपवतेच्या कार्याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदी रुपवते यांची निवड केली आहे. उत्कर्षा रूपवते यांच्या निवडीने पक्षाची ताकद वाढली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याशिवाय लवकरच राज्य कार्यकारिणीत आणखी एका विशिष्ट अशा महत्वपूर्ण पदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता पक्ष वर्तुळात वर्तवली जात आहे. एकूणच लोकसभेतील पक्षाच्या सक्षम बांधणीचा फायदा रूपवते यांना होणार असल्याचे दिसते. नगर उत्तर विभागामध्ये श्रीरामपूर हा सर्वात मोठा मतदार संघ असून या मतदार संघाची संख्या 3 लाख 2 हजार 133 एवढी आहे. लोकसभेचे राजकारण आणि स्थानिक राजकारण यामध्ये बरीच तफावत असली तरी
लोकसभा निवडणुकी मध्ये रूपवते यांना 90 हजार 929 असे तब्बल 91 हजार एवढे मताधिक्य तर श्रीरामपूर मध्ये 23 हजार मतदान त्यांना मिळाले होते हे विसरून चालणार नाही. एकूणच उत्कर्षा रूपवते यांची ताकद चांगलीच वाढल्याचे दिसून येते. याच धर्तीवर विधानसभेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात येणार असून नगर उत्तर विभागामधून श्रीरामपूर विधानसभेचे तिकीटही जवळपास त्यांनाच मिळणार असल्याचे समजते. लोकसभेतील या सहा मतदार संघात चाललेली जादू विधानसभेतही जादुई रंग दाखविल्या शिवाय राहणार नाही.
