भाजप चे पंटर असलेल्यांना शिवसेनेत(ठाकरे) अजूनही स्थान का? वरिष्ठांची दिशाभूल करुन पक्षविरोधी काम करणाऱ्यांचे पितळ उघड पाडणारच : इम्तियाज शेख, वाहतुक सेना शहरप्रमुख तथा मा उप शहर प्रमुख संगमनेर शिवसेना
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या शिंदेगट बीजेपी विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अश्या अतिशय अटीतटीच्या लढाईच्या वेळी काही गद्दारानी दुटप्पी भूमिका घेत शिवसेना महाविकास आघाडी चे उमेदावर भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात काम केले , स्वतःचे खिसे कसे गरम राहतील ह्या सर्व एकाच विचारधारेने एकत्र आलेल्या मंडळींना मुद्दाम एकत्र का आणले गेले? ही मंडळी निवडणुकीत संशयास्पद रित्या का वागली? शिवसेनेत् नावापूरते राहूंन् हे लोक ठाकरेंवर आणि महाविकासआघाडीवर सतत टीका करणाऱ्या भाजपच्या मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित कसे? भाजपच्या संगमनेर येथील जल्लोष कार्यक्रमात देखील यांची थेट उपस्थिती कश्यामुळे? तसेच भाजपच्या पदाधिकारि निवड कार्यक्रम सत्कार कार्यक्रमात देखील हि गद्दार लोक उपस्थित कशी राहतात,पक्षाचे वरिष्ठ पुरावे बघून देखील कार्यवाही का करत नाही? आधी देखील पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या दुतोंडी लोकांच्या तक्रारी सेनाभवन दिल्या आहेत मात्र निवडणुकीची वेळ जाऊ देण्याचा सल्ला वरिष्ठांनी दिला होता आता मात्र निवडणुकीत दिलेली जबाबदारी पार पाडून आणि भाजपा,मिंधेगटाचा पराभव करत शिवसैनिकांनी आपला उमेदवार विजयी करुन दाखवला असल्याने संघटनेत पुन्हा उत्साहाचे वातावरण तयार झालेले असतांना भाजपच्या नेत्यांचा तालावर नाचणारे गद्दार भाजप समर्थक तत्काळ काढून जिल्हा शिवसेनेची पुनर्बांधणी व्हावी या करीता जिल्हा प्रमुख सम्पर्क प्रमुख सम्पर्क नेते याना भेटून पुराव्यांनीशी तकरार करणार व शिवसेनेत राहून भाजप शी सालगी ठेवणाऱ्या गद्दारांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावे हि मांगनी देखील निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येत आहे, सतत शिवसेना पक्षा विरोधी वागणुक असलेल्या गद्दारांची हकाल पट्टी कधी होईल हा प्रश्न उपस्थित होत आहे लोकसभा निवडणूक दरम्यान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पाडन्यासाठी बीजेपी व शिंदे गटाने खुप प्रयत्न केले त्यातच शिवसेनेतील काही गद्दार देखील त्यांना आतुन सपोर्ट करत होते परन्तु निष्ठावंत शिवसैनिक कोंग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमाणिक कार्यकर्ते व मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले,परन्तु आता शिवसेनेतील गद्दाराला येणार्या विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून गद्दारांची त्वरित हकाल पट्टी करावी अशी मागनी करण्यात येत आहे
