मुख्यमंत्री म्हणतात ‘बहीण माझी लाडकी’ लाभ घ्यायला मात्र सतराशे साठ अटी : अमर कतारी (माजी शहरप्रमुख,शिवसेना ठाकरे)
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करुन राज्यभरातील
सर्व १८ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याची ही योजना असून महिलांना लाभ घेता येणार आहे, राज्यात आर्थिक दुर्बल घटक, परितक्त्या, विधवा,निराधार अशा सर्व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दिनांक १ जुलै ते १५ जुलै दरम्यान नोंदणी करायची आहे. गरजू महिलांना हा लाभ खरोखर मिळणार असेल तर राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागतच करतो मात्र केवळ निवडणुकी पुरता घोषणा करुन मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना असेल तर नागरिकांची ही फसवणूक नाही का? असा प्रश्न अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे.
सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना आधारकार्ड, डोमिसाईल, जन्मदाखला, बँक पासबुक, रेशनकार्ड, पासपोर्ट फोटो, मॅरेज सर्टिफिकेट/ गॅझेट(लग्नाच्या आधीचा नावाचे गॅझेट) रुपये अडीच लाखापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला अश्या भरमसाठ कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून अपूर्ण असणाऱ्या प्रत्येक कागदपत्र बनवायला सुमारे आठ ते पंधरा दिवस शासकीय कालावधी लागतो अनेक,6दिवस् सेतुः सुविधा केंद्रांची वेब साइट देखील ईरर दाखवत आहे,अनेक गोरगरीब महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट अथवा गॅझेट नाही त्यामुळे ह्या योजनेपासून महिला वंचित राहतील.
ह्या भरमसाठ कागदपत्रांच्या जाचक अटी तात्काळ रद्द करुन ही योजना अधिक सोपी व सर्वसमावेशक करावी तसेच लग्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी ही माझी मागणी असून त्याकरिता मुख्यमंत्री कार्यालय, महिला व बालविकास विभाग, राज्य महिला आयोग यांना देखील निवेदन सादर करणार असून राज्य सरकारने ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी वरील वस्तुस्थितीचा विचार करावा असे संगमनेर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.सदर निवेदनावर
, मा शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, भाऊसाहेब अमित युवासेनेचे अमित चव्हाण अक्षय बिल्लाडे पप्पू कांकाटे इम्तियाज शेख फैसल सय्यद परवेज शेख इमरान सय्यद,अमोल डुकरे अनुप म्हालस, रवि गिरी शरद कवडे, अक्षय गाड़े,त्रिलोक कतारी शीतल ताइ हासे सांगिता ताई गायकवाड वैशाली ताई वडतल्ले,राजश्री ताई वाकचौरे, प्रशांत खजुरे,प्रकाश चौथवे वेणुगोपाल लाहोटी ,प्रथमेश् बेल्हेकर,मुकेश काठे, फरोज कतारी, गणेश भाऊ धात्रक,सागर भागवत युवासेनेचे वैभव अभंग, गोविंद नागरे, दीपक वन्नम, दीपक सालूंके, विजय सातपुते,राजू सातपुते,पंकज पड़वळ, योगेश खेमनर, लखन सोन्नर, गुलाब कोकाटे, सचिन साळवे ,संभव लोढ़ा, जयदेव यादव, अनिल खुळे,ब्रम्हा खिड़के रंगनाथ फटांगरे,प्रविन चव्हाण, ओन्कार सस्कर,भावसार,जीतू दर्वे, संकेत खुळे सचिन पावबाकी, नीलेश गुंजाळ अजीज मोमिन, , नारायण पवार,सदाशिव हासे ,प्रवीण कड़लग, सुनील घुले,आदि शिवसैनिकांच्या आहेत
