संगमनेर भाजपाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला शाई फासून व अंडे मारून निषेध आंदोलन…

 

 संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

 

काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिर म्हणून समजल्या जाणाऱ्या संसदेमध्ये हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने संगमनेर बस स्थानकावरती राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेवर काळी शाई फासून, अंडे फेकून, पायदळी तुडवत निषेध करण्यात आला.

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवले त्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संगमनेर येथे भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानकावर राहुल गांधी याची प्रतिमेवर काळी शाई टाकून, प्रतिमेला अंडे फेकून मारत कार्यकर्त्यांनी पायी तुडवत अभिनव आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये अमोल खताळ पाटील, भाजपा निवडणूक प्रमुख – संगमनेर विधानसभा, रोहिदास साबळे, राजेंद्र सांगळे, शशांक नामन, शैलेश फटांगरे, वरद बागुल, भगवान गीते, भारत गवळी, सुरेश लांडगे, दिलीप रावल, वाल्मीक शिंदे, शुभम लहामगे, शंकर वाळे, हरीश वलवे, संदेश देशमुख, रोहिदास गुंजाळ, नवनाथ जोंधळे, संतोष हांडे, सोमनाथ नेहे, सतीश गोपाळे, पवन शिरतार, बाबासाहेब गुळवे, सुयोग गुंजाळ, प्रकाश खताळ, उमेश कोकणे,सौ.कांचन ढोरे, सौ.उषा कपिले, विकास गुळवे, अरुण थिटमे, गणेश पावसे, कैलास जेडगुले, संजय खताळ,अमित गुप्ता, प्रशांत दातीर, दत्तू वाजे सह हिंदुत्वादी संघटना वतीने प्रशांत बेल्हेकर, सुरेश कालडा, सचिन कानकाटे, कृष्णा डंबिर सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हिंदुस्थानमध्ये राहून हिंदूधर्मीयांविषयी चुकीचे वक्तव्य करत आहे त्यांना हिंदू धर्माविषयी चुकीचे वक्तव्य करण्याचा कुठल्याच नैतिक अधिकार नाही ते ज्या काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. त्याच काँग्रेस पक्षामुळे आज देशाचे संविधान धोक्यात आले आहे. हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीचा राहुल गांधी यांना अभ्यासाची नितांत गरज असून हिंदूं बांधवांनी एकत्र होऊन हिंदूंची ताकद राहुल गांधी व त्यांच्या बुरसटलेल्या विचाराला दाखवून देण्याची वेळ आली आहे.
अमोल खताळ पाटील
निवडणूक प्रमुख भाजपा, संगमनेर विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!