आमदार अमोल खताळ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

संगमनेर/प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमिततेचे संकट निर्माण झाले असून, त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यां च्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना या संकटातून बाहेर काढण्या साठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, वस्तुनिष्ठ पंचनामे करा शेतकऱ्याला हेक्टरी जास्तीत जास्त कशी मदत मिळेल तसेच मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सक्त सूचना आ. अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणारी सुतारवाडी पायरवाडी कौठे मलकापूर कुंभारवाडी, जांभूळवाडी आणि पिंपळगाव देपा परिसरातील नुकसानग्रस्त शेतपिकांची आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे यांच्यासह महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, पावसाने दिलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे तालुक्यातील अनेक भागामध्ये मका सोयाबीन बाजरी यासह विविध खरीप पिके जळून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणतेही निकष अथवा भेदभाव न करता सरसकट पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सविस्तर यादी तयार करावी यादीतून कोणी राहणार नाही याची अधिकारी दक्षता घेतील परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा दक्ष राहावे तसेच शासनाच्या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, यासाठी महसूल, कृषी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी. पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशा सूचनाही आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून ही कार्यवाही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल. शासनाच्या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. दिवाळीपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

– अमोल खताळ, आमदार
………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!