*पदाचा कोणताही बडेजाव नाही, खुर्चीचा अहंकार नाही… हाच आमदार अमोलभाऊ खताळ यांचा साधेपणा!*

संगमनेर 

राजकारणात अनेक वर्षांचा अनुभव, मोठमोठी पदे आणि सत्तेचा प्रदीर्घ प्रवास असला तरी सर्वसामान्य माणसाला किती सन्मान दिला जातो, यावरच खऱ्या लोकप्रतिनिधीची ओळख ठरते.
या छायाचित्राकडे जरा बारकाईने पाहा… समोर टेबल, मागे आमदारांची खुर्ची आणि सभोवताली सत्तेचे वातावरण असतानाही आमदार अमोलभाऊ खताळ स्वतः उभे राहून एका सामान्य नागरिकाचे म्हणणे ऐकत आहेत. समोरचा नागरिक मात्र अगदी सहजपणे बसून आपल्या अडचणी मांडत आहे.
या एका दृश्यात आमदारांचा साधेपणा प्रकर्षाने जाणवतो!
ना पदाचा गर्व, ना सत्तेचा माज, ना समोरच्या माणसाला उभे ठेवण्याचा आग्रह… उलट स्वतः उभे राहून सामान्य माणसाचे म्हणणे ऐकण्याची तयारी! लोकप्रतिनिधी म्हणून ही वृत्तीच खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे.
चाळीस वर्षांच्या राजकीय अनुभवाच्या तुलनेत नव्याने आमदार झालेल्या अमोलभाऊंची ही कृती एक वेगळाच संदेश देते. राजकारणात अनुभव महत्त्वाचा असतोच; पण त्याहून महत्त्वाचे असते ते माणसांशी वागण्याचे संस्कार आणि जनतेबद्दलचा आदर!
संगमनेरच्या सर्वसामान्य जनतेला आज हाच बदल अनुभवायला मिळत आहे.
आमदार म्हणजे जनतेपासून अंतर ठेवणारे व्यक्तिमत्त्व नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांसाठी सहज उपलब्ध होणारा माणूस. पद मिळाल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवणारा आणि सामान्य माणसाला आपलेपणाची जाणीव करून देणारा लोकप्रतिनिधी हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.
कारण… खुर्चीवर बसून सत्ता गाजवता येते; पण माणसांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी मन मोठे असावे लागते!
अमोलभाऊंच्या या साधेपणाला आणि जनतेशी असलेल्या आपुलकीच्या नात्याला मनापासून सलाम.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!