उत्तर नगरासाठी स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करा
दक्षिण नगरासाठी अहिल्यानगर, तर उत्तर नगरासाठी संगमनेर येथे स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्याची मागणी
संगमनेर प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने उत्तर नगर आणि दक्षिण नगर या भागांमध्ये प्रशासकीय व सहकार क्षेत्राच्या दृष्टीने असमतोल निर्माण होत आहे. हा असमतोल दूर करून सर्वसामान्य शेतकरी, सहकार क्षेत्र आणि प्रशासनाला न्याय मिळवून देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करावे आणि जिल्ह्याचे दोन स्वतंत्र मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये विभाजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात श्री. आत्माराम ज्ञानेश्वर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण नगरचे आमदार निलेश लंके आणि आमदार डॉ. किरण लहामटे यांना निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!