ह.भ.प.नारायणगिरी महाराज दुध संस्थेचे वतीने दुध उत्पादकांना स्मार्ट कार्ड व मोफत किटली वाटप….
संगमनेर / लोकवेध live न्यूज
अंभोरे येथिल अग्रगण्य असणा-या ह.भ.प.नारायणगिरी महाराज सहकारी दुध उत्पादक संस्थेचे वतीने दिपावली निमित्ताने स्मार्ट कार्ड व मोफत किटली वाटप कार्यक्रम रविवार दि.12/11/2023 रोजी सकाळी 10 वा. हनुमान मंदिरासमोरील प्रांगनात संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब देशमुख अंभोरकर साहेब चेअरमन ह.भ.प.नारायण गिरी महाराज दुध उत्पादक संस्था अंभोरे यांचे नावाची अध्यक्षीय सुचना उपसरपंच श्री.किसनराव खेमनर यांनी मांडली तर त्या सूचनेस अनुमोदन श्री.भाऊसाहेब दगडु खेमनर यांनी दिले.संस्थेचे दुध उत्पादक सभासद,नियमित दुध पुरवठा करणा-या दुध उत्पादकांना 5 ते 10 ली.चे किटली तसेच वर्षभरात विक्रमी दुध पुरवठा करणा-या दुध उत्पादकांना प्रथम क्रमांक श्री.तुळशीराम सावळेराम मलगुंडे द्वितीय क्रमांक श्री.दत्तु बाळाजी मलगुंडे तृतीय क्रमांक आक्षय भाऊसाहेब पाटोळे चतुर्थ क्रमांक श्री.भाऊसाहेब सावळेराम नवले यांना 20 आणी 15 ली.ची पारस कंपनिची उत्तम दर्जेदार किटली दिपावली निमित्ताने भेट देण्यात आली. त्यानिमीत्ताने संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाचे वतीने तयार करण्यात आलेले स्मार्ट कार्ड उत्पादकांना वितरित करण्यात आले.प्रास्ताविकांत श्री.सुभाषराव हळ्नोर यांनी दुध संस्था, दुध संघ याबाबत दुध उत्पादक शेतकरी यांचे आर्थीक विकास व्हावा यासाठी करत असलेले प्रयत्न ,तसेच आपणा सर्वांचे मार्गदर्शक,संगमनेर तालुक्याचे आदर्श कुटूंबप्रमुख मा.महसूल मंत्री, लोकप्रिय नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली ह.भ.प.नारायणगिरी दुध संस्थेचे चेअरमन सन्माननीय बाळासाहेब देशमुख अंभोरकर साहेब,महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंदा)मुंबई संस्थेचे मा.चेअरमन तथा संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाचे विद्यमान चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख (दादा) यांचे नेतृत्वाखाली ह.भ.प.नारायणगिरी महाराज सहकारी दुध उत्पादक संस्थेची वाटचाल ही प्रगतीचे दिशेने असुन आलेख वाढता आहे.दुध संघाचे माध्यमातून कोट्यावधि रुपयांचे स्टेट बैंक,अमृतवाहिनी बँकेचे माध्यमातून दुधाळ गायी खरेदी करण्यासाठी गो-धन योजनेतून अर्थसहाय्य करण्यात आले. दुध उत्पादक शेतकरी यांचा आर्थीक स्तर उंचावण्याचे दृष्टीने अनेक योजना सवलतीचे दरात राबवून दुध उत्पादक शेतक-यास नेहमीच मदत केली आहे करत आहे.दुध उत्पादक शेतकरी यांचे गायींचा आरोग्याचे वैद्यकिय औषध-उपचार आर्थीक दृष्ट्या परवडेल म्हणून संगमनेर तालुका दुध संघाने सवलतीचे दरात औषधे उपलब्ध व्हावे आणी त्यांना मदत व्हावी या दृष्टीने गायींसाठी औषोधोपचार वरिल खर्च खुप होतो तो वाढता खर्च कमी व्हावा म्हणून राजहंस मेडिकल सुरु केले आहे.त्यामूळे दुध उत्पादक शेतकरी यांना फार मोठी मोलाची मदत झालेली आहे.स्मार्ट कार्डचा उपयोग दुध उत्पादक शेतकरी यांना त्यांच्या गायींची संपुर्ण माहीती कार्डात भरलेली असुन वेळोवेळी त्या माहितीचा उपयोग दुध उत्पादक शेतकरी यांना चांगला होणार आहे.त्याचप्रमाणे कार्ड धारकास सवलतीचे दरात पशू-वैद्यकिय मेडिकल औषधे उपलब्ध होणार आहेत.त्याच बरोबर दुध संघांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ वितरकांचे दरात राजहंस स्टॉल दुध संघ,राजहंस स्टॉल यशोधन येथे मिळणार असुन आर्थीक बचत होणार आहे.असे विविध योजना दुध उत्पादक शेतकरी यांचे साठी एक पर्वणीच ठरणार आहे.तरी जास्ती जास्त दुध उत्पादक शेतकरी यांनी खाजगी कडे न जाता आपल्या संस्थेस दुध पुरवठा करावा असे आवाहन करण्यात आले.कारण खाजगी हे काही कमी काळासाठी आहे.त्यामूळे जास्तीचे भाव देतो असे सांगुन दुधाची होत असलेली दुध उत्पादकांची लूट ही थांबवावी.दुधाचे बाजार कमी झाले की,अनेक खाजगी दुकाने बंद होतात त्यातून आपन आजपर्यंत पुरवठा केलेले दुध आणी त्या दुधाचे पैसे मिळणे मुश्किल होते.उत्पादकास हमी मिळत नाही.याउलट दुध संघ,संस्था,यांचे लेखा परिक्षण होते.त्यामूळे दुध उत्पादकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळणेसाठी काहीच अडचण येत नाही.पैसे संस्थेत सुरक्षित राहतात.याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन सन्माननीय बाळासाहेब देशमुख अंभोरकर साहेब ,यांचा दुध उत्पादकांचे वतीने सत्कार जेष्ठ कार्यकर्ते श्री.लहानु भिमाजी खेमनर यांनी केला.ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय किसनराव खेमनर,अहिलाजी पा.जगनर,बाबुराव बाचकर,सोसायटी संचालक श्री.रमेशराव खेमनर,श्री.बाबुराव जगनर,भागवत जगनर,दुध संस्थेचे संचालक बाळासाहेब खेमनर,ज्ञानेश्वर वाकचौरे,सोसायटी संचालक भागवत खेमनर,ग्रामपंचायत सदस्य श्री.भाऊसाहेब खेमनर,माणिक पवार,किसन केसु खेमनर,दुध संस्थेचे संचालक माधवराव बाचकर,केरु पा.वाघमोड़े,व्हाईस चेअरमन तुळशीराम मलगूंडे आदींचे शुभ हस्ते किटली ,स्मार्ट कार्ड वितरण करण्यात आले. उपस्थित उत्पादकांना सन्माननीय बाळासाहेब देशमुख अंभोरकर साहेब यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री.तुळशीराम मलगूंडे आणी सर्व सन्माननीय संचालक,सेवकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास उत्पादक मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

