कनोलीत श्री बालाजी दूध संस्थेकडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट!
– दुध उत्पादकांच्या खात्यात रु. ४.६० प्रति लिटर प्रमाणे रिबेट व अनामत जमा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील प्रतिष्ठित श्री बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित या संस्थेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व दूध उत्पादकांना आनंदाची गोड भेट दिली आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला दाद देत, संस्थेने या वर्षीही रु. ४.६० पैसे प्रति लिटर प्रमाणे रिबेट व अनामत रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे.
संस्थेने दिलेल्या या लाभाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
🔹 संस्था रिबेट : ₹ १.३०
🔹 संघ रिबेट : ₹ १.३०
🔹 उत्पादक अनामत : ₹ २.००
एकूण: ₹ ४.६० पैसे प्रति लिटर
तसेच दुध दर नियंत्रण निधी म्हणून ₹ ०.२० पैसे प्रति लिटर इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
दिवाळीच्या तोंडावर आलेली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, संस्थेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी सर्व दूध उत्पादकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून त्यांनी सांगितले की –
“शेतकऱ्यांच्या विश्वास आणि कष्टामुळेच आमची संस्था प्रगतीच्या मार्गावर आहे. भविष्यातही उत्पादकांचे हित जपणे हेच आमचे प्रमुख ध्येय राहील.”
या निर्णयामुळे श्री बालाजी दूध उत्पादक संस्था पुन्हा एकदा शेतकरीहितासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध केले आहे.
शुभेच्छुक
चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ
श्री बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्या., कनोली

