गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते फिरत्या नारळी सप्ताहाचे धर्म ध्वजारोहण

वरवंडी येथे १७ डिसेंबर रोजी  माणिक गिरी महाराज बिरोबा महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

संगमनेर / लोकवेध live न्यूज / ह भ प गणेश महाराज

संगमनेर तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र माणिक बाबा देवस्थान व माणिक गिरी महाराज बिरोबा महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे १७ डिसेंबर ला आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दि 26/11/2023) सकाळी नऊ वाजता ह.भ.प.महंत मठाधिपती गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले.या वर्षी वरवंडी समस्त ग्रामस्थ यांनी या फिरत्या नारळी सप्ताहाचा नारळ घेऊन  हा सप्ताह संत उत्साहात जोरदार करण्यात आहे. याची तयारी सर्व ग्रामस्थांनी सुरू केली असून  सप्ताहाचे हे  वर्षे 15 वे आहे.रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ह भ प महंत मठाधिपती गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असुन या मिरवणूकीने सप्ताहाची सुरुवात होणार आहे . या अखंड हरिनाम सप्ताह साठी सर्व वरवंडी पंचक्रोशीतील व तालुक्यातील भाविक भक्तांनी तळमळीने सामील व्हावे.तसेच भाविकांनी फिरत्या नारळी सप्ताह काळात गुन्यागोविंदाने एकत्र यावे आणि हा संत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे अवहान वरवंडी गावातील  समस्त ग्रामस्थ व सप्ताहा कमिटीने केले आहे. यावेळी समस्त ग्रामस्थ वरवंडी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!