भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ –  सरपंच नारायण मरभळ 

पिंपरणे येथे ग्रामपंचायतच्या वतीने संविधान दिन साजरा 

 

 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आपल्या देशाचे संविधान हे जगभरात सर्वश्रेष्ठ असून भारतीय संविधानाने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व बहाल केले आहे, असे गौरवोद्गर पिंपरणेचे सरपंच नारायण मरभळ  यांनी काढले.संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात  आयोजित भारतीय संविधान गौरव सोहळ्यानिमित्त ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेचे सरपंच नारायण मरभळ व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले

यावेळी छत्रपती दूध संस्थेचे व्हा चेअरमन शिवराम वाकचौरे तंटामुक्ती अध्यक्ष अरुणसाहेब देशमुख, सामाजिक कार्यकर्ते उमाजी जोर्वेकर,सरपंच नारायण मरभळ ग्राप सदस्य  उत्तमनाना राहींज मंजाबापू साळवे निलेश बागुल निलेश चत्तर धनंजय वाकचौरे  अण्णासाहेब वाकचौरे पोलीस पाटील विनोद साळवे संजय बागुल  किरण बागुल  आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच मरभळ म्हणाले की  जगभरात अनेक देश असले तरी आपला भारत देश मात्र संविधानावर चालतो. आपल्या देशाचे संविधान जगात श्रेष्ठ असून या संविधानामुळे गरीब श्रीमंत दरी नष्ट झाली आहे. भारतीय संविधान हे  माणसाच्या उत्कर्षासाठी आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश साळवे प्रदीप मांडे नितीन बागुल यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!