स्लॅबवर चढून आ.खताळ यांनी केला मंदिर गर्भगृहस्लॅब भरणीचा शुभारंभ

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी तील निर्मलनगर येथे त्रिपुरारी पौर्णिमे च्या शुभमुहूर्तावर विश्व चैतन्य सद्गुरू नारायण महाराज, नारायणपूर प्रणित दत्तमंदिर तसेच सद्गुरू नारायण महाराज मंदिराच्या गर्भगृहाच्या स्लॅब वर चढून आमदार अमोल खताळ पा. यांच्या हस्ते करण्यात आला.
धार्मिक व आध्यात्मिक परंपरेला महत्त्व असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभदिनी मंदिराच्या बांधकामातील महत्त्वपूर्ण टप्प्याला सुरुवात झाल्याने परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक विधी आणि मंगलमय वातावरणात हा शुभारंभ पार पडला. मंदिराच्या उभारणीमुळे भाविकांना श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक साधनेसाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सद्गुरू नारायण महाराज यांच्या आध्यात्मिक विचारांचा आणि भक्तिमार्गाचा वारसा जपण्याच्या दृष्टीने निर्मलनगर येथे उभारण्यात येणाऱ्या या मंदिराला विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या गर्भ गृहाच्या स्लॅब भरणीचे काम सुरू झाल्याने मंदिर उभारणीच्या प्रक्रियेला आणखी गती मिळणार आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन भाविकांना दर्शन व धार्मिक उपासने साठी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे यावेळी संगमनेर आणि अकोले विभागाचे प्रमुख बापुसाहेब देशमुख, पोपट वर्पे राजेद्र देशमुख, गणेश आंबरे संपत गुंजाळ ,योगेश गुजांळ, आशोक कादळकर अत्याबा गुंजाळ,संकेत गुंजाळ मधुकर गुंजाळ
रणजीत गुंजाळ बाबासाहेब देशमुख यांच्यासह दत्त दत्त मंडळ उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!