चिमुकले बाल-गोपाळांचे बहरदार नृत्य आणि गीतांनी स्नेह सम्मेलन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न!…
संगमनेर / लोकवेध live न्यूज
जिल्हा परिषद व डागवाडी प्राथमिक शाळा अंभोरे यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.27/02/2024 रोजी स्नेह सम्मेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे शाळेचे भव्य प्रांगणात आयोजन करण्यात आले.शाळेने आज पर्यंत शालेय कामकाज याबरोबरच ,विद्यार्थी ,विद्यार्थीनीसाठी असलेल्या विविध शासकीय योजना,विद्यार्थी गुणवत्ता ,शिक्षणाचा दर्जा,महाराष्ट्र शासनाची आदर्श शाळा ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली त्याबरोबरच समाजातील सर्व घटकांतील विद्यार्थी,विद्यार्थिनिंना विविध प्रकारची शासकीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून दिला.याबरोबरच विद्यार्थी आणि प्रथम आई -वडील हे आपल्या जीवनातील प्रथम ज्ञानपिठ केंद्र असुन शिक्षक हा दुसरा गुरु आहे.गुरु आणि शिष्य ही पवित्र नाते जपण्याचे काम करायचे आहे.गुरुस,शिक्षकांस जीवनात फार मोलाचे स्थान आहे. विद्यार्थि, विद्यार्थिनी यांचेतील शिक्षणावितिरीक्त असलेले कलागुणांना वाव मिळावा त्यांचे अंगी असलेले कलेचे सुप्त गुण जागृत व्हावे, शिक्षणाबरोबरच विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचेतील उपजत कलाकार,उत्कृष्ठ अभिनय सम्राट,नृत्यकार अशा गुनांचा साक्षात्कार होवुन त्यांना या कार्यक्रमातून नवजीवनात प्रेरणा मिळेल.ख-या अर्थाने महाराष्ट्रातील सांस्कृतीक कलेचा वारसा जोपसन्याचे काम या कार्यक्रमामुळे झाले. म्हणून जवळ-जवळ एक महिना फार मोठे परिश्रम घेत शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनी यांचेकडून विविध नृत्य,बहारदार गीतांचा सराव सर्व शिक्षकांनी करुन घेतला.मंगळवार दि.27/02/2024 रोजी सांय.7 वा.अंभोरे जिल्हा परिषद शाळेचे भव्य प्रांगणात सरपंच सौ.सुरेखा भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव सोपानराव खेमनर,चेअरमन श्री.रावजी भागा खेमनर,श्री.विठोबा नामदेव खेमनर,ग्रामपंचायत सदस्य सौ.शांता नितीन खेमनर,सौ नंदा माणिक पवार,श्री.सुभाषराव हळनोर ,श्री.हौशिराम वाघमोड़े,श्री.आण्णासाहेब खेमनर,श्री.भाऊसाहेब नामदेव खेमनर,श्री.शरद खेमनर,श्री.बाबुराव पिरता खेमनर,श्री.माणिक पवार,अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे श्री.किसनराव खेमनर,संचालीका सौ.सरस्वती घुले मँडम,या प्रमुख मान्यंवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.रात्री 10.30 पर्यंत चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी,विद्यार्थिंनिंनी गिते सादर करत नृत्यांचा अविष्कार सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शालेय परिसरात विविध विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच रंगीबेरंगी विजेच्या प्रकाशात रंगमंचावर सजावट करुन आकर्षक करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थी,विद्यार्थिंनिंनी अनेक नृत्य बहारदार गिते सादर करुन विद्यार्थी,विद्यार्थिंनिंनी पालकांबरोबरच उपस्थित ग्रामस्थ,महिला,युवक युवतींची मने जिंकली.आपल्याच बाल-गोपाळांनी सादर केलेले नृत्य,गिते यास साद देत उपस्थित प्रमुख मान्यंवरांनी व ग्रामस्थ,महिला,युवक,युवतींनी रोख स्वरुपात देणगी देवून अक्षरश:पैशाचा वर्षाव केला आणी आपल्याच मुलांनी केलेल्या सुंदर बहरदार गीतांवर नृत्यांचा अविष्कार सादर केला त्याचा मनमुराद आनंद उपस्थितांनी घेतला. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.नन्नवरे सर,डागवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.डावरे मँडम,श्री.वाकचौरे सर,श्री.पावसे सर,श्रीमती घोलप मँडम,श्रीमती साळुंके मँडम,श्री.साठे सर या सर्वांनी हा सुंदर कार्यक्रम यशस्वी केला.त्याबद्दल त्यांचेवर अभोरे गावातील स्थानिक संस्था ,विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतून ग्रामस्थ,महिला,विविध संघटना,महिला बचत गट,युवकां कडून कौतुकाचा,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थ,पालक,महिला,युवकांनी कौतुक ,अभिनंदन केले कार्यक्रमाचा आस्वाद,आनंद गावातील ग्रामस्थ,महिलांनी घेतला तसेच पंचक्रोषितिल ग्रामस्थ,महिला,युवक,युवती मोठ्या संख्खेने उपस्थित होते. या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.रनाते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती साळुंके मँडम यांनी मानले.*
