पालक आणि मुलांचं नातं हे मैत्रीपूर्ण असाव… बापूसाहेब देशमुख 
 प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयात गुणवंतांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न 
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
मुलांच्या भविष्याविषयी पालकांचे काही स्वप्न असतात. मात्र, आपल्या मुलांचा कल कोणत्या विभागाकडे आहे. याची जाणीव पालकांनी ठेवायला हवी. मुलांचा कल ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. आई-वडिलांनी आपल्या मुलांची मैत्रीपूर्ण नाते तयार करावे मुलांकडून  पालकांची स्वप्न असणं गैर नाही.परंतु, आपले विचार त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे. त्यांचा कल ओळखून प्रोत्साहन दिल्यास ते अधिक चांगल्या पद्धतीने आपले भविष्य घडवू शकतात. आकाशाला गवस नाही घालण्याचं सामर्थ्य मुलांनी ठेवायला हवं, तशी स्वप्ने पाहायला हवेत स्वप्नांच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. असे प्रतिपादन बहुउद्देशीय  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी केले
 संगमनेर तालुक्यातील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी ते अध्यक्षीय  भाषणात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमासाठी डी एम देशमुख, कैलास काळे, राजहंस दुध संघ संचालक रवीद्र रोहम,सुभाष पवार सर, विलास साळवे सर,कोंडीराम बागुलसर, भाऊसाहेब वाकचौरे सर,ऍड. राहुल देशमुख, मुख्याध्यापक रमेश वाळे सर,संजय बागुल जाखुरीच्या सरपंच भालेराव ताई, नवनाथ कोटकर सर,दत्ता काळे, बाळू काळे, दत्तात्रय पवार, संजय उपाध्ये सुरेश पवार सुनील देशमुख मारुती सांगळे सोमनाथ खेमनर
आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व शालेय साहित्य वाटप करून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. पालकांचाही सत्कार करण्यात आला पालकांनी आपल्या भाषणात शाळेच्या गुणवत्तेविषयी पालकांनी भरभरून कौतुक करत  समाधान व्यक्त केले मुलांना गगनगिरी विद्यालयात का घालावे हे येथील संस्थाचालक व शिक्षकांनी दाखवून दिले
कु.देशमुख  सिद्धी  सुनिल ही  केंद्रात  95.60% गुण मिळवून पिंपरणे  इयत्ता दहावी केंद्रात पहिली आली इयत्ता बारावी च्या केंद्रात
कु.ऋतिका केशव घुगे 88 % गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून
 या दोघींचा  विशेष सत्कार करण्यात आला
 कार्यक्रम विशेष करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी
 सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक  विद्यार्थी सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!