सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलाच्या गुरुकुल विभागाचा निकाल १००%
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ ता.राहुरी येथील विद्यालयाने नुकताच जाहीर झालेल्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा एस.एस.सी.बोर्डाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.यात गुरुकुल विभागाचा निकाल १००% लागला आहे तर सेमी विभागाचा निकाल ९७.
०% इतका लागला आहे.
विद्यालयातून ११८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यात डिस्टिंक्शनमध्ये २९ विद्यार्थी,तर फर्स्ट क्लास- ४७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
विद्यालयातून अनुक्रमे प्रथम क्रमांक सुर्यवंशी संकेत राजेंद्र-९०.६%,द्वितीय क्रमांक शिंदे सार्थक रघुनाथ ८८.६ % तर तृतीय क्रमांक वाघचौरे अथर्व शिवाजी-८७.०८ यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,सहाय्यक अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे, पत्रकार किशोर भांड,के.के.बोरा, युवानेते किरण कडू, पंकज कडू , विक्रांत कडू,गणेश कडू, प्राचार्य आर.बी बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात, भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.
