प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात माता – पालक मेळावा व हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील प.पू. गगनगिरी महाराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात
बहुउद्‌दे‌शीय ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब देशमुख व प्राचार्य श्री. रमेश बाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात माता – पालक मेळावा व हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.. प्रभावती त्रिंबकराव देशमुख होत्या. सौ. कविता ढोमसे. औटी  मैडम यांनी महिलांना ‘विदयालयातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक समस्थांचे निराकरण करण्यासाठी महिलांना आवाहन केले.
सौ. प्रभावती देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणातून महिलांना मार्गदर्शन केले. स्त्रियांनी व मुलींनी स्वतःला सक्षम बनवले पाहिजे, विविध छोट्या मोठ्या व्यवसायातून महिलांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत बनवली पाहिजे  स्त्रियांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना स्वतःचे आरोग्य देखिल सांभाळावे. आरोग्याकडे लक्ष दयावे असे आवाहन सौ. प्रभावती देशमुख यांनी केले.
प्रमुख यावेळी विविध बचत गटरांच्या संपर्क सौ. मनिषा बागूल, सिध्दी – विनायक महिला बचत गटाच्या  सौ. जयश्रीताई ठोंबरे, पिंपरणे प्रमुख संघाच्या अध्यक्षा पूनम साळवे ग्रामसंघाच्या  सौ. शैला साळवे सूचिव सौ. सुवर्णा मांडे , ग्रामसंघाच्या सचिव मांडे, सौ. शोमा ठोंबरे, सौ. नंदा वाकचौरे  आदी महिलांनी आपले मनोग मनोगत व्यक्त केले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ. मीना सानप त्यांनी महिलांना आरोग्य व्र या विषयावर मार्गदर्शन केले. आरोग्य सेविक समतोल आहार या विषयावर मार्गदर्शन केले
यावेळी सौ. स्वाती देशमुख,सौ. जयश्री, रहाणे, सौ. मनिषा वाकचौरे, सौ. नम्रता मांडे, सुनिता वायकर, सौ शोभा मांडे, सौ. अनिता ठोंबरे , सौ. सुवर्णा रकटे, सौ. मनिषा जोर्वेकर, सौ. अनिता काळे, मंगल जोर्वेकर रोहिणी जोर्वेकर, सौ. विद्या देशमुख आदि महिला-माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्याः
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. ढोम्से कविता यांनी केले तर आभार सौ. स्वाती थोरात व मनिषा बागुल यांनी सानले.
प्राचार्य  रमेश वाळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले व सन्माननीय महिला व अध्यक्षांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!