कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी शासकीय लोकार्पण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुरदृश्य प्रणालीद्वारे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सिद्धेश कदम यांच्या हस्ते होणार
संगमनेर (प्रतिनिधी) :
संगमनेर शहराच्या सांस्कृतिक कला नाट्य क्षेत्रात भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असून, या नाट्यगृहाचे सोमवार दि ३०नोव्हेंबर२०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता शासकीय लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे तसेच राज्याचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
संगमनेरला सांस्कृतिक साहित्य, कला, नाट्य परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे याच क्षेत्रामध्ये कवी अनंत फंदी यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि सांस्कृतिक कला आणि नाट्य चळवळीला अधिक बळकटी मिळावी हा होता तो हेतू डोळ्यासमोर ठेवून संगमनेर नगर परिषदेच्या वतीने कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बांधण्यात आले होते परंतु हे नाट्यगृह बंदिस्त व्हावे अशी नाट्य आणि कलाप्रेमींची मागणी होती. त्यांच्या मागणीचा विचार करून बंदिस्त नाट्यगृह करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला.
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून हे नाट्यगृह बंदिस्त केले गेले आहे. या नाट्यगृहामुळे स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था, सांस्कृतिक मंडळे आणि विविध सामाजिक संस्थांना कार्यक्रम सादर करण्यासाठी तसेच नाटक, संगीत, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कलाविष्कारांसाठी या नाट्यगृहाचा उपयोग होणार आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळण्या बरोबरच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या नाट्यगृहाचा उपयोग होणार आहे या सर्व अत्याधुनिक सुविधानयुक्त सुरू झालेल्या या नाट्यगृहाच्या शासकीय नियमानुसार लोकार्पण सोहळाहोणार आहे तरी या लोकार्पण सोहळ्यासाठी संगमनेरच्या कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर नगर परिषदेच्या आणि शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे
