सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ उत्साहात साजरा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आज सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय उत्साहात पार पडला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बुवाजी बाबा पुणेकर उपाध्यक्ष उमाजी बाबा पुणेकर सचिव जानकीराम पुणेकर सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केअर हेल्थ क्लबचे सीनियर ब्रांच मॅनेजर प्रवीण मालुंजकर सर होते तर प्रमुख पाहुणे सेज प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री अजित वाळे साहेब उपस्थित होते .
श्री वाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या जीवनात दहावी आणि बारावी ही दोन वर्ष अतिशय महत्त्वाची असून या काळात आपण कठोर परिश्रम केले ध्येय निश्चिती केली आणि आपलं चारित्र्य अबाधित ठेवलं तर पुढील आयुष्यात आपण यशाचा शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण आपले चारित्र्य जपायला हवे यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील दाखले देत आपल्या यशाचे जनक सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजून सांगितलं आपणही भविष्यात अनेक मार्ग असून आपल्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव देऊन त्यानुसार आपले जीवन घडवण्याचा प्रयत्न करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण मालुंजकर सर यांनी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपण सर्वात प्रथम आपले ध्येय ठरविले पाहिजे ते ध्येय गाठण्यासाठी नियोजन करून त्यासाठीच आपण प्रयत्न करायला हवेत आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे व्यक्तीची ओळख ही त्याच्या शरीरावरून नाही तर बुद्धीवरून ठरत असते त्यामुळे आपण यश मिळवण्यासाठीच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.
यावेळी दहावीचे वर्गशिक्षक श्री विजय शेंगाळ सर यांनी आपल्या मनोगत मधून विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवास सांगत त्यांच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना आवाहन करताना आयुष्यात तुम्ही कुठे असाल किती मोठे व्हाल परंतु जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा ही संस्था शाळा आणि शिक्षक आठवल्याशिवाय राहणार नाही त्यांचा विसर तुम्हाला पडणार नाही . तसेच विद्यार्थ्यांचा दहावी मध्ये असणारी गुणवत्ता आणि टारगेट सांगितले.
ववकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खेमनर सर यांनी केले यावेळेस त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेची यशोगाथा सांगत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आणि दिलीप दिवे सर यांनी आपल्या मार्मिक शब्दांमधून पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाचकर सर यांनी आपल्या मनोगत मधून विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात तुम्हाला कुठलीही अडचण निर्माण झाली गरज भासली तर आपलं विद्यालय संस्था आणि शिक्षक आपल्यासाठी सदैव तत्पर असतील त्यांची मदत घेऊन तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणी सोडवू शकता असे सांगितले.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव श्री जानकीराम पुणेकर यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देत त्यांचा अभ्यासातील उत्साह वाढवण्यासाठी इयत्ता दहावी मध्ये 90% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2100 रुपये बक्षीस दिले जाईल तसेच आपण सर्वांनी कठोर परिश्रम करून भरपूर अभ्यास करून आपल्या परिवाराचे आपल्या शाळेचे गावाचे आणि संस्थेचे नाव रोशन करावे असे सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांनी कुठे कमी न पडता कठोर परिश्रम घेऊन यशाचा शिखर गाठावं आणि आपलं आयुष्य घडवाव असंही ते म्हणाले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून उत्तम यश मिळवून शाळेचे नाव उज्वल करू असे सांगितले तसेच शिक्षकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना शुभेच्छा देत शिक्षकांचा सत्कार केला. तसेच विद्यालयाला ऑडिओ मिक्सर ,वायरलेस आणि कोडलेस माईक भेट म्हणून दिला. डीग्रस गावचे ग्रामस्थ श्री जानकु भाऊ नान्नर यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पट्टी पेन्सिल व खोड रबर देऊन गौरव केला.
तसेच शिक्षक महेंद्र पुणेकर सर यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व्हिडिओ चित्रफित बनवून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या शाळेतील आठवणी जागृत करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण केली. बारकू पुणेकर यांनी साऊंड सिस्टम व्यवस्था बघितली.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी इयत्ता नववीच्या वर्ग शिक्षक दिवे सर आणि सर्व विद्यार्थी यांनी पार पाडली सुंदर नियोजन करून दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे व्यवस्था त्यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप दिवे सर राजेश्वरी बिडगर आणि काजल होडगर यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख साहेबराव नेहे यांनी केले. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सचिव जानकीराम पुणेकर सर विद्यालयाचे मुख्याध्यापक बाचकर सर ज्येष्ठ शिक्षक खेमनर सर दिवे सर नेहे सर महेंद्र पुणेकर सर पांढरे सर शेंगाळ सर बारकू पुणेकर मामा चिंधे मॅडम अचपळे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.