कोळवाडे, पिंपरणे शिवारात तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दारुच्या नशेत गैरकृत्य, 
आरोपीला पोलिसांनी चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या.!
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  एका नराधमाने दारूच्या नशेत अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर स्वतःचे कपडे काढुन गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नातेवाईकांनी हे कृत्य पाहिले असता आरडाओरडा करून माणसे जमुन बेदमचोप दिल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. 24 में 2025 रोजी दुपारी 4 वाजता कोळवाडे पिंपरणे परिसरात घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबराव रंगनाथ गायकवाड (रा. कोळवाडे, ता. संगमनेर) असे या नराधमाचे नाव आहे. जेव्हा हे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी त्याला चांगला धडा शिकवला. त्याने तेथुन पळ काढुन फरार झाला होता. मात्र, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याचा शोध घेऊन तात्काळ बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलीचे आई वडील हे मुळचे अकोले तालुक्यातील आहे. ते कामाच्या शोधात पिंपरणे परिसरात राहण्यासाठी येतात. त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे. ते मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ते आपल्या बहिणीकडे एकत्र राहत होते. दि. 20 में पासुन ते काम करत होते. दि. 24 मे रोजी सकाळी आठ वाजता पिडीत मुलीचे आई वडील व बहिण मेहुणे असे सोबत नेहमीप्रमाणे मजुरीचे कामाला गेलो होतो. त्यावेळी पिडीत तीन वर्षांची चिमुरडी ही बहिणीच्या मुलांसोबत घरी ठेवलेली होती. सर्व काम आवरून पिडीत मुलीचे आई वडील सहा वाजता घरी आले. तेव्हा तीन वर्षाची चिमुरडी ही घरात झोपलेली होती.
दरम्यान, पिडीत मुलीचे आई वडील घरा जवळ असताना त्यांचे नातेवाईक आले. आणि त्यांनी सांगितले की, दुपारी चार वाजता आरोपी साहेबराव गायकवाड हा पिडीत तीन वर्षाची चिमुरडी घरात झोपेल असताना तेथे दारूच्या नशेत गेला. तिला पाहुन या नराधमाची नियत फिरली. त्याने स्वतःचे कपडे काढले. तेव्हा आम्ही पाहिले असता तेथे आरडा ओरडा केला. परिसरातील सर्व लोक तेथे जमले. आरोपी साहेबराव गायकवाड याला घराबाहेर काढले. त्याला बाहेर काढताच संतापलेल्या लोकांनी त्याला बेदम चोप दिला. तो हळु-हळु घोळक्याचे बाहेर आला आणि त्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. जमावातील लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता. तो सापडून आला नाही.
” दरम्यान, या घटनेची वार्ता ही संगमनेरात अगदी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर घटनेता निषेध सुरू झाला. त्यामुळे, आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली होती. पीडित मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी रविवार दि. 25 में 2025 रोजी दुपारी आरोपी साहेबराव गायकवाड याला अटक केली आहे. . आरोपीला शिक्षा होईल अशा पद्धतीने पोलिसांनी या घटनेचा शोध घ्यावा. सबळ दोषापत्र तयार करुन पीडित बालिकेला न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!