पिंपरणे ते घोडेझाप रस्त्यावरील पुलाच्या कामाची आशियाई विकास बँकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी; उत्कृष्ट दर्जाचे कौतुक!

पिंपरणे | प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील पिंपरणे ते घोडेझाप या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्ण झाले असून, या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या अधिकाऱ्यांनी पिंपरणे गावाला भेट देत देव नदीवरील पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पुलाच्या बांधकामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य तसेच कामाच्या गुणवत्तेची पाहणी करून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पुलाचे बांधकाम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे झाल्याचे नमूद करत संबंधित यंत्रणेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या पाहणी दौऱ्यावेळी सामाजिक संरक्षण तज्ज्ञ विजय आजणीकर, रस्ता सुरक्षा तज्ज्ञ सय्यद, पर्यावरण तज्ज्ञ पुजारी, रस्ता अभियंता शिवकुमार कहाते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता संजय राठोड, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता सचिन खेडेकर, कनिष्ठ अभियंता राहुल गायकवाड आणि सहाय्यक अभियंता ओंकार उदावंत उपस्थित होते.

तसेच सरपंच नारायण मरभळ, शिवसेना नेते काकासाहेब गायकवाड, उत्तमनाना राहिंज, उपसरपंच बाळासाहेब निकम, निलेश बागुल, गंगाराम वाकचौरे दिनकर ठोंबरे, भीमा राहिंज यांच्यासह राजमुद्रा कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार पवन धाडीवाल उपस्थित होते.

पिंपरणे ते घोडेझाप हा रस्ता परिसरातील नागरिक, शेतकरी शाळा कॉलेज विद्यार्थी आणि वाहनधारकांसाठी महत्त्वाचा असून, या मार्गावरील पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे दळणवळण अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडताना निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गुणवत्तापूर्ण बांधकाम, प्रभावी नियोजन आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी, ठेकेदार व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून विकासकामे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात, याचे हे काम उत्तम उदाहरण ठरले आहे.

पुलाच्या कामाची पाहणी करून त्याच्या उत्कृष्ट दर्जाचे कौतुक केल्याबद्दल आशियाई विकास बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे तसेच या विकासकामासाठी सहकार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, अभियंते, कर्मचारी, ठेकेदार आणि स्थानिक ग्रामस्थांचे उपस्थितांनी मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!