*जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालयात जागतिक अंडी व रेबीज दिवस साजरा..*

नेवासा / दत्तात्रय शिंदे 

महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ,नागपूर अंतर्गत असलेल्या जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका,भेंडा विद्यालयामध्ये जागतिक अंडी दिवस दिनांक ०९/१०/२०२६ रोजी साजरा झाला.
कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे प्राध्यापक डॉ.शरद शिंदे यांनी अंड्याचे आहारात असणारे महत्व पटवून देताना अंडे हे शाकाहारी आहे याविषयी माहिती दिली.तसेच अंड्यातील असणारे विविध घटक, शरीराची पचनीय क्षमता, आहारात प्रती वर्षी शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी अंड्यांचे प्रमाण याविषयी सखोल माहिती दिली. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे नारे दिले. याप्रसंगी उपस्थित सर्वाना आहारातील अंड्याचे महत्व व समाजामध्ये अंड्याविषयी असणारे गैरसमज याविषयी जनजागृती व्हावी असे आवाहन केले.
तसेच जागतिक रेबीज दिनानिमित्त रेबीज आजार विषयावर विद्यालयाचे डॉ.शिवाजी शिंदे यांनी रेबीज आजार होण्याची कारणे, त्यासाठीचे प्रतिबंधात्मक लसीकरण, रेबीज आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी उपस्थित पशुधन व्यवसायातील घटकांना रेबीज आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी असे उपस्थितांना आवाहन केले. रेबीज प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री.सोपान मते यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील प्रा.वाबळे आदित्य, डॉ.चामुटे कृष्णा,प्रा.अभिजित भणगे, प्रा.धनंजय अंबुले, प्रा.गौरव ठुबे, प्रा.प्रमोद बर्डे, प्रा.काकासाहेब उकिर्डे व प्रा.ज्ञानदेव कोलते यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!