आता साक्षात निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांचीही गौतमी वर टीका
गौतमी पाटील हिला 3 गाण्यासाठी काही लाख मोजतात, आम्ही पाच… इंदुरीकर महाराज असं काय म्हणाले गौतमीबद्दल?
लोकवेध live न्यूज :
निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांनी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर टीका केली आहे. आम्ही पाच हजार मागितले तर याने बाजार मांडला म्हणतात. पण गौतमीला तीन गाण्यासाठी तीन लाख देतात, असा चिमटा त्यांनी काढला.
गौतमी पाटीलची प्रसिद्धी कमी होताना दिसत नाहीये. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल होतो. लावणी नृत्यांगनांमध्ये गौतमी पाटील सर्वाधिक मानधन घेते. एका कार्यक्रमासाठी ती तब्बल तीन लाखाच्या पुढे रक्कम घेते. लोकही एवढी रक्कम देऊन तिचा कार्यक्रम आयोजित करतात. यावरून गौतमीची क्रेझ किती आहे हे लक्षात येतं. मात्र, याचबरोबर गौतमीवर टीकाही होत असते. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो. तिचं नृत्य अश्लील असल्याचं म्हटलं जातं. याबद्दल गौतमीने माफीही मागितली होती आणि आपल्या नृत्यात सुधारणाही केली होती. आता साक्षात निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांनीही गौतमीवर टीका केली आहे.
आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील महोत्सवात काल इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी नाव न घेता गौतमी पाटीलवर टीका केली. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतोय. त्याचं काय खरं आहे, असं म्हटलं जातं. मात्र गौतमी हिने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नाही. असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
