संगमनेरची भाकरी कोकणच्या आमटीचे सुंदर एकीकरण :- पाटणकर
संगमनेर
सप्ताह सोहळ्यात बोलताना संजय पाटणकर यांनी, हठयोगी, सिद्धयोगी गगनगिरी महाराजांच्या कृपेने संगमनेरची भाकरी आणि कोकणची आमटी यांचे सुंदर एकीकरण घडले आहे. महाराजांच्या इच्छेनेच सर्व कार्य घडत असते आणि तेच भक्तांकडून करून घेतात असे सांगितले.
हा सप्ताह सर्वांचा आहे. येथे कोणत्याही आमंत्रणाची गरज नाही. अहंकार बाजूला ठेवून दुसऱ्याला मोठे करण्याचे काम करा असे आवाहन संजय पाटणकर ( प. पू. गगनगिरी महाराजांचे नातू ) त्यांनी केले. आज पेरलेले हे बीज भविष्यात वटवृक्षासारखे बहरून फुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर वीणा पूजन, गगनगिरी महाराज ट्रस्टचे संजय पाटणकर ,नीलम खताळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. हरिकीर्तनानंतर भक्तगणांनी प्रसादाचा लाभ घेतला.
