संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान पार पडले ; उत्साहात झालेल्या या निवडणुकीत 97 टक्के मतदान
उद्या होणार मतमोजणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
शुक्रवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले.
शांततेत आणि उत्साहात झालेल्या या निवडणुकीत 97 टक्के मतदान झाले. संगमनेरच्या जनता नगर मधील राजमाता जिजाऊ शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी मतदानाला प्रारंभ झाला सायंकाळी चार वाजता मतदान संपले इतर शनिवारी सकाळी याच शाळेमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकूण 3614 मतदारांपैकी 3510 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळ आणि राज्याचे विद्यमान महसूल मंत्री जनसेवा मंडळामध्ये सरळ लढत झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दोघा आजी-माजी महसूल मंत्र्यांच्या समर्थकांमध्ये लढत झाली असून या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
झालेले मतदान 
——–
1)सोसायटी एकूण मतदान 1677  झालेले 1621/ 97%
——
2) ग्रामपंचायत 1387 झालेले मतदान 1367 /99%
——-
3 ) हमाल मापाडी 147 झालेले मतदान 143 / 100%
————
 4) व्यापारी 403 झालेले मतदान 370= / 92%
——
एकूण मतदान-3614
झालेले मतदान- 3505
 /97%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!