गौतमी पाटील चा कार्यक्रम आणि काहीतरी घटना हे नित्याचच , चालू कार्यक्रमात छतासह लोक खाली कोसळली,
वैजापूर / लोकवेध live न्यूज
आपल्या नृत्यामुळं आणि कार्यक्रमात काही ना काही गोंधळ काही ना काही घटना घडणारच हे नित्याचच आहे त्यामुळे गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे. तिच्या कार्यक्रमदरम्यान मोठ्या प्रणामात गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू असतानाच समोर छतावर उभी असलेली काही लोक छतासह खाली कोसळली.वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील यांची लोकप्रियता पाहता कार्यक्रम बघण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अशातच जागा कमी पडल्याने काही नागरिक परिसरातील दुकानांवर कार्यक्रम पाहण्यासाठी चढले होते. तर कार्यक्रमादरम्यान काही लोक हे एका पत्राच्या शेडच्या दुकानावर बसून कार्यक्रम बघत होते. अशातच हे पत्र्याचे शेड लोकांसह खाली कोसळले.
