राष्ट्रीय दलित पँथरच्या संगमनेर तालुका संपर्क प्रमुख पदी मच्छिंद्र यादव यांची निवड
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेची बैठक झाली या बैठकीत राष्ट्रीय दलित पॅंथर संगमनेर शाखा संपर्कप्रमुख पदी मच्छिंद्र यादव यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या मार्गदर्शनाने संगमनेर शहराध्यक्ष राजू खरात यांनी ही निवड केली आहे. यावेळी शहराध्यक्ष राजू खरात, प्रवीण गायकवाड, मंजाबापू साळवे, संदीप दळवी, विजय खरात, संतोष जेधे, प्रकाश वाघमारे तसेच महिला कार्यकर्त्या व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होतेसदर संघटना ही कुठल्याही राजकीय नसून ही संघटना सामाजिक आहे हे संघटना जनसामान्यांच्या पीडितांच्या हक्कांसाठी लढणारे मजबूत संघटन आहे. दरम्यान,यादव हे राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांनी भालेराव यांची संगमनेर त्याच्या संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात केली. मुळचे संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द बंधारा रहिमपूर गावचे असणारे मच्छिंद्र यादव हे नेहमीच समाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. समाजसेवक म्हणुन त्यांनी तालुक्यात नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यात नावलौकीक मिळवला आहे. ग्रामीण भागातील विविध प्रश्नावर आवाज उठवून त्यांनी अनेक घडामोडी बद्दल वेळोवेळी सहकारी केले आपण केलेल्या सामाजिक आंदोलनातील योगदान व आपले कार्य पाहून ही संघटना आपणास वरील पदावर नियुक्त करत आहे असे पत्र दिले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होतआहे. पुढील काळात संघटनेची व्यवस्थित मोट बांधून संघटनेची पाळेमुळे मजबूत करण्याची जबाबदारी यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्यांच्या निवडी बद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, राजहंस दूध संस्थेचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख,संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव,शहराध्यक्ष राजू खरात यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळीमच्छिंद्र यादव यांचे ओझर रहिमपूर ग्रामपंचायत व सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने निवडीचे स्वागत करण्यात आले
