भंडारदरा पर्यटन स्थळावर नौकाविहार पर्यटकांसाठी सुंदर अनुभूती

भंडारदरा / लोक वेध live न्यूज / संजय महानोर

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असणा-या भंडारदरा पर्यटन स्थळावर नौकाविहार पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत असुन जास्तीत जास्त पर्यटक नौकाविहाराला पसंती देताना दिसुन येत आहेत .


सविस्तर वृत्त असे की भंडारदरा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे . या पर्यटनस्थळावर पावसाळ्यातील नयनरम्य धबधबे , आशिया खंडातील सर्वात खोल असणारी सांदनदरी , रंधा फाॅल , महाराष्ट्राचे एवरेस्ट कळसुबाई तर ब्रिटीश कालीन भंडारदरा धरण , असे खास महत्वाची पर्यटनस्थळे असुन याच भंडारद-याच्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पावसाळ्याच्या अगोदरचा काजवा महोत्सव प्रसिद्ध आहेत . नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने पर्यटक भंडारद-याच्या दिशेने यायला सुरुवात झाली .

सर्वत्र सुर्य आग ओकत असताना भंडारद-याला मात्र उन्हाचे प्रमाण काहीसे कमी आहे . तरी सुद्धा उन्हाचा बसणारा चटका कमी व्हावा म्हणुन पर्यटक भंडारदरा धरणामध्ये नौकाविहारासाठी प्राधान्य देताना दिसुन येत आहे . एका बोटीमध्ये साधारणतः सहा ते आठ माणसांना बसविण्यात येत असुन मुबलक दरात भंडारदरा धरणाची सफर केली जाते . तर काही पर्यटक बोटीतुनच रतनगड सफरीला पंसती देताना दिसुन येत आहे . नौकाविहाराला मोठ्या प्रमाणात पंसती मिळत असुन भंडारदरा धरणाच्या दोन्ही बाजुला अगदी सुरक्षित असे नौकाविहार होत असुन जास्तीत जास्त पर्यटकांनी नौकविहाराला पंसती देण्याचे आव्हान स्थानिक आदिवासी बोट धारकांनी केले आहे . भंडारद-याच्या नौकाविहारामुळे स्थानिकांही रोजगार निर्माण झाला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!