केलवड गावात जिगरबाज दोस्तांच्या “दोस्ती बिर्याणी हाऊस” चा शुभारंभ
राहाता : लोकवेध live न्यूज
कोरोना महामारीच्या कालखंडानंतर समाजात मोठ्या प्रमाणावर तरुणांनी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात झेप घेतलेली आहे. त्या अनुषंगाने राहता तालुक्याची केलवड गावामध्ये नुकतच गावातील तरुण उद्योजकांनी एकत्रित येऊन महामार्गाच्या लगत दोस्ती बिर्याणी या बिर्याणी हाऊस’ची सुरू केलेले आहे. प्रथमता गावामध्ये अशा पद्धतीच छोटास बिर्याणी हाऊस असावं अशी संकल्पना चंद्रकांत बाळासाहेब गोर्डे आणि आदिनाथ गोर्डे त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि त्यातूनच पुढे यांच्या या बिर्याणी हाऊस ची संकल्पना सत्यात उभी राहिली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रा. श्री . लक्ष्मण देवराम गोर्डे ( सचिव नरेश राऊत फाउंडेशन केलवड ) विशाल दशरथ वाघे अध्यक्ष अयोध्या युवा प्रतिष्ठन केलवड ( उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय केलवड ) अंजाबापू जठाड मा. ग्रा. प स., दीपक कांदळकर, बाळासाहेब गमे, चांगदेव गोर्डे, रामभाऊ गमे, लक्ष्मन ठोंबरे, विलास खडांगळे, शरद घोरपडे, पत्रकार आदिनाथ सर्जेराव गाढे, अयोध्या युवा प्रतिष्ठान केलवड चे सगळे कार्यकर्ते उपस्थित होते. केलवड गावच्या गावकऱ्यांना आता गावातले गावातच या दोस्ती बिर्याणी हाऊसमध्ये वेगवेगळ्या कॉलिटी चे नॉनव्हेज बिर्याणी सोबत पदार्थ तसेच चायनीज पदार्थ चाखण्यासाठी मिळणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या दोस्ती बिर्याणी हाऊसच्या उद्घाटन प्रसंगी भेट देऊन चंद्रकांत बाळासाहेब गोर्डे आणि आदिनाथ बाळासाहेब गोर्डे यांच्या या व्यवसायासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
