शेतकऱ्याच्या वैष्णवी ने दहावीत मिळवले 94 टक्के
धांदरफळखुर्द / लोकवेध live न्यूज / नितीन कोकणे
धांदरफळखुर्द (गोडसेवाडी) गावातील शेतकरी व्यवसायाचे विश्वनाथ गोडसे यांच्या मुलीने निमज येथील भारतरत्न राजीव गांधी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांसह प्रशालेच्या नावलौकिकात भर टाकणारी कामगिरी करून दाखविली आहे. या वैष्णवीने हिने ९४. टक्के गुण संपादन करून प्रशालेत द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. तसेच उच्चतम श्रेणीत आलेल्या वैष्णवी ने आपल्या गावाचा व कुटुंबाचा नावलौकिक केला असून ग्रामीण विभागातील शेतकऱ्यांच्या मुलींची ही यशस्वी कामगिरी शहरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल अशीच आहे. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तसेच या वेळी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डार्फ केटल केमिकल्स व संप्रेरम संस्थेचे समन्वयक हिमान्शु लोहकरे धांदरफळखुर्द ग्रामपंचायत सदस्य शरद भाऊ कोकणे ,संगीता गोडसे,बाबासाहेब म्हसकुले,बाजीराव गोडसे पत्रकार नितीन कोकणे,वडील विश्वनाथ आई आशा गोडसे,चुलते कोंडाजी गोडसे आजोबा दादा गोडसे उपस्थित होते.
