कपड्यांचे आहेर प्रथा बंद ; काकडवाडी ग्रामस्थांचा निर्णय

संगमनेर / लोकवेध live न्यूज 


संगमनेर तालुक्यातील काकडवाडी याठिकाण ग्रामस्थांनी मीटिंग आयोजित केली होती.यामध्ये अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली ती म्हणजे वेगवेगळ्या समारंभामध्ये कपड्यांच्या स्वरूपात आहेर भेट देण्याची प्रथा आपल्याकडे काळानुरूप रुढ आहे.ती प्रथा बंद करून रोख रक्कमाचा आहेर देण्याची संकल्पना काही नागरिकांनी मांडली.ग्रामस्थांनी देखिल यांस सहमती दर्शवली.ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे यांच्या घरी आयोजीत करण्यात आलेल्या गंगापूजन,वास्तूशांती व जागरण गोंधळाच्या कार्यक्रमापासुन या कपड्यांचा आहेर स्वीकारण्याच्या प्रथेला पायाबंद घालण्यात आला असून रोखीने रक्कम स्वरूपात आहेर स्विकारण्याची प्रथा रूढ करण्यात आली आहे.कपड्यांच्या आहारामध्ये टोपी-टावेल,शाल इतर वापरण्याचे कपडे भेट दिली जातात.मात्र हे कपडे कायम वापरात येत नसल्याने एकमेकांना त्याची पुनः देवाण-घेवाण होत असल्या कारणाने तसेच मोठ्या प्रमाणात जमा झालेले कपडे तसेच घरात पडून राहतात.त्यामुळे कपड्यांच्या आहारावर खर्च करण्यापेक्षा सदर कुटुंबाला आर्थिक स्वरूपात हातभार लागवा म्हणून रोख रक्कम स्वरूपात आहेरची प्रथा पुन्हा सुरू करण्यात आल्याने या निर्णयाचे ग्रामस्थांनी देखील स्वागत केला आहे.इतराने देखील असे उपक्रम चालू करणे काळाची गरज बनली आहे. याप्रसंगी बोलताना काकडवाडी गावचे उपसरपंच जनार्दन कासार,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप शिरसाठ,तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुळे यांनी आपले भावना व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!