संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सत्यनारायण महापूजा आयोजित करून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

शिवसेनेचा ५७वा वर्धापन दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर देखिल एकनिष्ठ शिवसैनिकांनी काल पदाधिकारी शिबिरात मोठी गर्दी केली होती, संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काल मुंबई येथे उपस्थित राहून मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले तसेच आज १९जून रोजी शिवसेना शहर व तालुका शाखेच्या(ठाकरे गट) वतीने संगमनेर येथील नेहरू गार्डन परिसरातील कार्यालयात सत्यनारायण महापूजा आयोजित करून शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिकांना प्रसाद वाटप करून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेत कितीही गद्दाऱ्या झाल्या तरी शिवसैनिक हे ठाकरे, मातोश्री व सेनाभवन ह्या त्रीसूत्राला मानूनच वाटचाल करत राहतील व आगामी काळात निवडणुकांमध्ये शिवसेना आपली खरी ताकद भाजप व मिंधेगटाला दाखवून देईल असे मत या ठिकाणी *शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी व्यक्त केले. लोकसभा संपर्कप्रमुख बबनराव घोलप, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे, जिल्हाप्रमुख मुजीब शेख तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण* यांनी वर्धापन दिना निमित्त संगमनेर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या असून वर्धापन दिनाच्या यशस्वी नियोजनासाठी शहर प्रमुख अमर कतारी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठारभाग प्रमुख संजय फड, युवासेनाजिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख गोविंद नागरे युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे युवा सेना उपशहर प्रमुख अक्षय गाडे युवा सैनिक फैसल सय्यद शिवसेनेचे उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, वेणूगोपाल लाहोटी झिंजुर्डे सर, रोहित निराळी ,सचिन साळवे, राजाभाऊ सातपुते ,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय भाऊ सातपुते, विजय भाऊ भागवत, सागर शेंडे विशाल बापते ,भीमा अनाप ,मुकेश काठे प्रसन्ना गोरे, प्रशांत खजुरे ,त्रिलोक कतारी, प्रलोक कतारी, सनिल कतारी ,प्रकाश चोथवे, महेश कतारी संदीप कतारी केवल कतारी महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सुरेखाताई गुंजाळ महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे उप तालुका प्रमुख वैशाली ताई वडतल्ले, ग्राहक संरक्षक कक्षाचे सदाशिव हासे शिवसेना तालुका समन्वयक एस पी राहणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग रंगनाथ फटांगरे अमित फटांगरे, आसिफ भाई तांबोळी अजिज भाई मोमीन माधव फुलमाळी शाखाप्रमुख लिंगमूर्ती चिंता अनिल खुळे विभाग प्रमुख ओंकार सस्कर शहर सचिव अनुप म्हाळस व तमाम शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!