संगमनेरला १०२ कोटींच्या विविध विकासकामांचा आज शुभारंभ व लोकार्पण
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ त्यांची प्रमुख उपस्थिती
संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना चालना देण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा बुधवार,दि२३सप्टेंबर २०२६ रोजी जलसंपदमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे.
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे सुमारे ४ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या उपसा जलसिंचन योजना कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या योजनेमुळे परिसरातील शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.तसेच समनापूर येथील गणपती मंदिर परिसरामध्ये सुमारे ९७ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या संगमनेर ते वडगाव पान फाटा, निळवंडे ते कौठे कमळेश्वर राष्ट्रीय महामार्ग (जांभूळवाडी फाटा) या मार्गावरील रस्ते सुधारणा कामाचा शुभारंभकरण्यात येणार आहे. तसेच संगमनेर नगरपरिषद हद्दीतील साई नगर येथील म्हाळुंगी नदी पुलाला स्व. खासदार बाळासाहेब विखे साईसेतू या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.तसेच गंगामाई घाटावर सुमारे४०लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हिंदू दशक्रिया विधी घाटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.
तसेच श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर येथील सुमारे३० लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
