राष्ट्रीय समाज पक्षाची संगमनेर तालुका आढावा बैठक संपन्न_

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे आढावा बैठक बुधवार दि 21 रोजी संपन्न झाली यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय मुख्य महासचिव माननीय सुशील कुमार साहेब यांची उपस्थिती लाभली त्यांनी संगमनेर येथील इतिहासाला उजाळा देत पक्षाच्या ध्येय धोरणाबद्दल माहिती दिली कार्यकर्त्यांच्या मनात नवी उमेद निर्माण करत पुढील वाटचालीसाठी_सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी_ _सदस्य मा सय्यद बाबा शेख अहमदनगर_ _जिल्हाध्यक्ष माननीय नानासाहेब जुंधारे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड, जिल्हा सचिव नामदेव काशीद युवक_ _जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ खेमनर, संगमनेर तालुकाध्यक्ष सोपानराव तांबडे आदी मान्यवर उपस्थित होते._
_तालुकाध्यक्ष सोपानराव तांबडे यांनी कार्यकारिणी जाहीर_ _करत पक्षाच्या पुढील झेडपी पंचायत समिती निवडणुकी तयारीसाठी रणनीतीबद्दल__ ते _बोलत होते.तर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी संगमनेर तालुक्यात झालेली आंदोलने व_ _पूर्ण केलेली कामे या बद्दल माहिती दिली.
राष्ट्रीय समाज पक्ष संगमनेर नवनियुक्त कार्यकारिणी मध्ये महिला तालुकाध्यक्ष तैय्यबा जावेद सय्यद तर _शहराध्यक्षपदी पार्वताबाई चुडामन भोई यांची नियुक्ती करण्यात_ _आली. संगमनेर युवक तालुकाध्यक्ष पंकज विकास खेमनर तर तालुका सचिव पदी सुनील रावसाहेब खेमनर व _विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष_ _अभय ठकाजी राजनोर आणि संगमनेर तालुका संपर्कप्रमुख पदी बाळासाहेब वावरे यांची नियुक्ती करण्यात आली. शंकर कारभारी खेमनर सोशल_ _मीडिया तालुकाप्रमुख तर सोहेल देशमुख यांची अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सय्यद बाबा शेख यांनी मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या._
_राष्ट्रीय समाज पक्ष संगमनेर_तालुका आढावा बैठक प्रसंगी अण्णा शरमाळे गणेश खेमनर, प्रकाश गायकवाड नवनाथ वावरे, एकनाथ बिडगर, तसेच शिवतांडव प्रतिष्ठानचेउपाध्यक्ष शुभम घुले आणि_तिलक गांधी, शुभम घुले, मयूर कांडेकर, अभी रोहम व दत्तू जायभाय आदी कार्यकर्ते उपस्थित होते_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!