परिस्थितीचा बाऊ न करता जीवनात यश संपादन करता येते – युरोपियन स्पेस प्रतिनिधी श्रद्धा गुंजाळ
निमगाव जाळी/ लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

संगमनेरची शान असणाऱ्या व जगातील सर्वात कमी वयाच्या अनलॉग अस्ट्रोनट म्हणून जगात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रद्धा गुंजाळ यांनी आज रयत शिक्षण संस्थेच्या,आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आश्र्वी बुद्रुक या विद्यालयातील विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन या विषयावर मार्गदर्शन केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस व अब्दुल कलाम वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस या दोन सन्मानाच्या मानकरी ठरणाऱ्या श्रद्धा गुंजाळ यांची युरोपियन स्पेस एजन्सी मध्ये निवड झाली आहे. नासामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर जगभरातून निवडलेल्या सहा जणांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. एक शेतकऱ्याची मुलगी जीला अंतराळाबद्दल आकर्षण होते व अंतराळवीर होण्याचे स्वप्न तिने पाहिले आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जोमाने अथक अथक परिश्रम घेऊन जीवनात यश संपादन केले .आपला हा संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला जीवनामध्ये यश संपादन करण्यासाठी कधीही परिस्थितीचा बाऊ न करता संघर्ष करत यश संपादन करता येते हा अनुभव यावेळी त्यांनी कथन केला.व आपण कश्या पद्धतीने यश मिळवले हे ही सांगितले.तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत धडपड केली पाहिजे हे देखील विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले .विद्यालयाचे मा.प्राचार्य जनार्धन बर्डे सर यांनी श्रध्दा ह्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सन 1979 -1980 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने विद्यालयातील इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेले गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांचे दिलेले संच हे श्रद्धा गुंजाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले हया सर्व माजी विद्यार्थ्यांनी जवळ जवळ हया गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी 29000 किमतीचे पुस्तके खरेदी केले.ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद स्थानिक स्कुल कमिटी ह्यांचे सहकार्य लाभले.
