संगमनेर शहर व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उद्धवसाहेब ठाकरेंची खरी शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी करू : अमर कतारी शिवसेना शहरप्रमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आज संगमनेर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी तालुकाप्रमुख रावसाहेबदादा गुंजाळ यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे व शहरप्रमुख अमर कतारी यांचा रावसाहेब गुंजाळ मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यावेळी आपले मनोगत मांडतांना जुन्या व नव्या शिवसैनिकांना एकत्र करून, रुसवे फुगवे नाराज्या दूर करून संघटनेचे काम पुन्हा नव्या जोमात उभे करण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही अमर कतारी यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिली. तसेच ज्येष्ठ आणि युवक शिवसैनिकांनि खऱ्या अर्थाने उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभे राहून एकजूट दाखवत काम करण्याची वेळ आली असल्याचे आपल्या मार्गदर्शनाच्या भाषणात रावसाहेब दादा गुंजाळ यांनी भावना व्यक्त केल्या. दरम्यान नवीन जिल्हाप्रमुख या नात्याने प्रयोगशील राहून तुमच्या सूचना, विनंत्या ऐकून त्यानुसार पक्षीय काम करणार व कामं केलेल्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे मुजीबभाई शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले.
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
उपस्थित शिवसैनिकांचे आभार तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी मानले तर प्रास्तविक प्रथमेश बेल्हेकर यांनी केले. सदरील कार्यक्रमात माजी नगरसेवक सुनीलभाऊ दिवेकर, प्रकाश क्षत्रिय, दीपक साळुंके, जगूभाऊ निकम, यांसह रावसाहेब गुंजाळ यांच्या सोबत काम केलेले अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित असल्याने संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकटी नसून जुन्या व नव्या पिढ्या त्यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाल्याने युवकांमध्ये उत्साह आला होता. यावेळी संपर्क प्रमुख नरेश माळवे शिवसेना उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, दीपक वन्नम ,विकास डमाळे, इम्तियाज शेख ,शहर कार्याध्यक्ष दीपक जी साळुंखे ,युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण असिफ भाई तांबोळी विजय भागवत सुमित चायल
रंगनाथ फटांगरे, गोविंद नागरे, सुदर्शन इटप ,अजिज मोमीन, शोएब शेख ,योगेश खेमनर युवा सेना तालुकाप्रमुख, राजू सातपुते ,एकनाथ खेमनार, माधव फुलमाळी रिक्षा सेनेचे सर्व पदाधिकारी व्यापारी आघाडी चे संभव लोढा सचिन साळवे परवेझ शेख ,उपस्थित होते सर्वांचे स्वागत व आभार अक्षय गुंजाळ यांनी मानले