दाढ खुर्द खळी परिसरात पुरेसा पाऊस अभावी पेरण्या खोळंबल्या

 

दाढ खुर्द / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाड खुर्द खळी झरेकाटी परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने येथील पेरण्या पूर्णपणे ठप्प झाले आहे दाड खुर्द खळी झरेकाटी परिसरात सालाबाद प्रमाणे येथील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटला रोहिणी नक्षत्र सुरू झाले त्यानंतर सात जूनला मृग नक्षत्र सुरू झाले व त्यानंतर 22 जूनला आद्रता हे नक्षत्र सुरू झाले या तीनही नक्षत्रांमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने येथील शेतकरी चिंतेत गेला असून येथील शेतकरी हा मे महिन्याच्या शेवटला रोहिणी नक्षत्रामध्ये थोडासा पाऊस झाला तरी लगेच मशागत करून कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करत असते परंतु पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून कपाशीसाठी सरी काढून ठेवली परंतु रोहिणी हे नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने पुढे दहा दिवसांवर मृग नक्षत्र सुरू होईल व मृग नक्षत्रामध्ये पेरणी पेरणी होईल इतके पाऊस होईल असे वाटले होते परंतु पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने दोनही नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने आता आद्रता हे नक्षत्र सुरू झाले परंतु यामध्ये आषाढ पहाळी सोडून मोठा असा पाऊस न पडल्यामुळे शेतातील माती ही गरम असून ओली खोलवर न गेल्यामुळे पेरणी पूर्णपणे कोळंबले आहे

त्याचा शेतकऱ्यांनी सेवा सोसायटी नागरी बँक नॅशनल बँक का खाजगी सावकार या कडून कर्ज काढून बियाणे व खते खरेदी करून ठेवले आहे परंतु पावसाने दडी मारल्याने येथील शेतकरी अतिशय घाबरले असून शासनाने येथील शेतकऱ्यांना पुढील पिकांसाठी मोफत बियाणे व कर्ज माफ करून विज बिल सुद्धा माफ करावे अशी अपेक्षा येतील शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकडे ठेवली असून कृषी विभाग व महसूल विभाग यांनी येथील शेतकऱ्याची पंचनामे करून ेक्‍टरी 25 हजाराची मदत करावी अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे ठेवली आहे शासनाने येथील शेतकऱ्याकडे लक्ष वेधवे असे आवाहन येथील शेतकऱ्यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!