झोळे येथील तरुण चार दिवसापासून बेपत्ता
संगमनेर : लोकवेध live न्यूज
तालुक्यातील झोळे येथील महेश किसन येवले (वय २९) हा तरुण २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता असून तो बेपत्ता झाल्याची तक्रांर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
          संपत मालुंजकर यांनी शहर पोलींसाना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे साडू किसन मारुती येवले (रा. झोळे, ता. संगमनेर) यांचा महेश हा मुलगा आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याने त्याच्यांवर उपचार सुरु आहेत. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास महेश हा काका संपत मालुंजकर (रा. गणेश विहार फेसटू मालदाड रोड, घुलेवाडी) यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने त्याची दुचाकी त्यांच्या घरी लावुन मावशी अनिता हिस ‘मुबंईचे डॉक्टर संगमनेर येथे येणार असल्याने त्याच्याकडे . येतो’ असे सांगितले. परंतू बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा संगमनेर शहरासह परिसरात शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.  रंगाने सावळा, पाच फुट उंच, अंगात फुल बाह्याचा गुलाबी रंगाचा शर्ट व राखाडी कलरची पँट तसेच पाठीत वाकून चालतो असे वर्णन महेशचे असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!