रयत संकुल सात्रळच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक
अथर्व जालिंदर बनगये व राहुल प्रकाश शिंदे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी दिल्ली येथे निवड.
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
नुकत्याच यवतमाळ या ठिकाणी झालेल्या YOUTH GAMES MAHARASHTRA STATE CHAMPIONSHIP 2023 राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सात्रळ तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादु कडू पाटील,विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयचे खेळाडू अथर्व जालिंदर बनगये वयोगट 14 वर्ष 100 मीटर रनिंग मध्ये राज्यस्तरीय सुवर्णपदक व कुमार राहुल प्रकाश शिंदे वयोगट 17 वर्ष लांब उडी मध्ये राज्यस्तरीय सुवर्णपदक पटकाविले दि. 26 27 28 ऑगस्ट 2023 ला जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली आहे .या सर्व विद्यार्थ्यांना बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय,सात्रळचे क्रीडा शिक्षक प्रा.सुर्यवंशी.पी.पी सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी सर्व खेळाडूंचे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट निमीत्त अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अरुण पाटील कडू यांच्या शुभहस्ते यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सुशीलाताई थोरात ,विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक त्र्यंबकराव राशिनकर , जूनियर विभाग प्रमुख प्रा. दिघे व्ही.बी सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या यशस्वी खेळाडूंचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, विभागीय अधिकारी तुकाराम कान्हेरकर, सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर शिवाजीराव तापकीर,प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड.विजयराव कडू पा.स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष संभाजीराजे चोरमुंगे मा. बबनराव कडू पाटील, शांतीभाऊ गांधी माजी सरपंच भास्करराव फणसे पत्रकार किशोर भांड डॉ. बोरा,माजी सरपंच गणेश पाटील कडू,युवानेते किरण पा.कडू पंकज कडू पाटील, विक्रांत पाटील कडू पाटील, भाऊसाहेब पेटकर, प्राचार्य सुशीलाताई थोरात,पर्यवेक्षक त्र्यंबकराव राशिनकर सर्व शिक्षक व सेवक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
…
