गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल करण्यात आला होता. गौतमी पाटील एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला होता
याप्रकरणी पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच संतापल्या असून त्यांनी याविषयी कठोर भूमिका घेतली आहे.
महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे एका पत्राद्वारे सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना सूचित केले आहे. यानुसार पुणे पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दाखल घेत गुन्हा दाखल केला आहे
