तिर्थक्षेत्र विकासदेवगड खंडोबा देवस्थान ट्रस्टला ‘क’ वर्ग दर्जा मंजुर, देवस्थान मुळे हिवरगाव पावसा गावची ओळख महाराष्ट्रात

संगमनेर / लोकवेध live न्यूज 
तालुक्यातील प्रती जेजुरी अशी ओळख असलेले कुलदैवत श्रीक्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान ला क वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे अशा आशयाचे पत्रक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त मंडळाला महसूल दुग्धव्यवसाय पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.
‘क’ वर्ग देवस्थानच्या दर्जा प्राप्त व्हावा यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, हिवरगाव पावसा सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सौ. सुजाता गणेश दवंगे ग्रामसेवक हरिष गडाख उपाध्यक्ष यादवराव पावसे, सचिव मोठ्याभाऊ बढे, खजिनदार गोरक्ष पावसे, विश्वस्त काशिनाथ पावसे, भाजप कार्यकर्ते केशव दवंगे, गणेश दवंगे, गणेश पावसे,सचिन सस्कर, दादासाहेब गडाख, प्रकाश पावसे, सोमनाथ दवंगे व विश्वस्त मंडळाने तात्कालीन भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुकाध्यक्ष सतिश कानवडे, नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्वीय सहायक प्रमोद रहाणे, अशोक कानवडे, गणपत पावसे सर, चंद्रशेखर गडाख, पांडुरंग गडाख, सुरेश पावसे यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कडे मागणी करत पाठपुरावा केला होता.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देवगड देवस्थानामुळे संगमनेर तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. नियोजनबद्ध यात्रा उत्सव दरवर्षी पार पडत असतो, लाखों भाविक दर्शनासाठी उपस्थित राहत असतात. भाविकांना देवस्थान ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी देवस्थान ट्रस्टने मागणी केली होती आज अखेर मंजुरी मिळाल्याने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने, भाविकांनी, ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आभार मानत धन्यवाद दिले आहेत.
देवगड खंडोबा देवस्थान परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ निधी उपलब्ध होणार असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!