पिंपरणेत लक्ष्मीआई देवी च्या सातव्या माळेची मिरवणूक संपन्न
 पिंपरणे /लोकवेध live न्युज

पिंपरणे गावचे ग्रामदैवत लक्ष्मी आई नवरात्र उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात  सुरू असून या काळात धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे नवरात्रीचे सहा दिवस अतिशय उत्साह संपन्न झाले .

नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गामातेचे सातवे रुप कालरात्रिची पूजा केल्याने रोगांचा नाश होतो आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो. तसेच ग्रहांचे अडथळे आणि भय दूर होतो, असे मानले जाते. गावात
नवरात्र उत्सवात जुन्या परंपरेनुसार सातव्या दिवशी चोळी पातळ व माळेची मिरवणूक होत असते सातव्या  माळीनिमित्त चोळी पातळ व पुष्पहारच्या माळीची भव्य मिरवणूक काढण्यात आली देवीचा नाम घोष करत गावातील महीला पुरुष तरून तरुणी बाळ गोपाळ सहभागी झाले होते मिरवणूक संपन्न होई पर्यंत मंदीरात  देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला
 गावातून मिरवणूक होऊन गावातील लखाबाई देवीला माळ अर्पण करण्यात आली त्यानंतर भवानी माता देवीला माळ अर्पण करण्यात आली व सती आई देवीला माळ अर्पण करून मिरवणूक लक्ष्मी आई मंदिराकडे आली त्या ठिकाणी देवीला भक्ती भावाने माळ अर्पण करून महाआरती घेण्यात आली त्यानंतर आलेल्या सर्व भक्तांसाठी फराळाचा महाप्रसाद देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!