सर डी एम पेटीट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे एक्स्टर्नल ऑडिट उत्साहात संपन्न

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर येथील आय.एस. ओ. प्रमाणित गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सन 2023–24 या वर्षीचे ISO 9001:2015 एक्स्टर्नल ऑडिट ऑडिटर श्री.विशाल राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी विशाल राणे यांचे स्वागत व सत्कार विद्यालयाचे प्राचार्य सी. एन. निकम यांनी केले. ऑडिटर विशाल राणे यांनी विद्यालयाचे सर्व कामकाज व नियोजनाच्या फाइल्सची तपासणी केली.यामध्ये कार्यालय, ग्रंथालय, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, परीक्षा विभाग, शिस्त व शालेय व्यवस्थापन, अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन, शिक्षकांचे पाठ निरीक्षण ,सांस्कृतिक विभाग,परिसर स्वच्छता , शिक्षक-पालक संघ रजिस्टर , विद्यार्थी हालचाल रजिस्टर , शिक्षक हालचाल रजिस्टर आदी विभागांचे कामकाज सविस्तर बघून समाधान व्यक्त केले. शेवटी क्लोजिंग मीटिंगमध्ये काही महत्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या. काही विभागांचे काम उत्कृष्ट असल्याचे त्यांनी यावेळी झालेल्या सभेत सांगितले. आय एस ओ चे काम पाहणारे विद्यालयाचे एम.आर. श्री.प्रकाश वनम यांनी योग्य नियोजन केले . याप्रसंगी सिन्नर संगमनेर सेंटरच्या अधीक्षक व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ सौ अस्मिता देशपांडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी वरिष्ठ लिपिक सतीश चंदन, विद्यालयाचे सत्र प्रमुख अमोघ कुलकर्णी, ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज प्रा गुलाब गायकवाड आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!