अमृतवाहिनी सहकारी बँकेची ऑनलाइन प्रणाली कौतुकास्पद -मा. आ. डॉ. तांबे
अमृतवाहिनी बँकेत इंटरनल ऑडिट विषयावर जिल्हास्तरीय चर्चासत्र संपन्न

सहकारी व नागरी बँक मध्यमवर्गीयांचा आधार – मा. आमदार डॉ तांबे

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

-प्रत्येकाच्या जीवनात बँकिंग हा विषय अत्यंत महत्त्वाचा झाला असून ग्रामीण भागातील नागरी व सहकारी बँकांनी सर्वसामान्य माणसांना मोठा आधार दिला आहे बदलत्या काळात नवनवीन तंत्रज्ञान व ऑनलाइन प्रणालीचा वापर अनिवार्य बनला असून अमृतवाहिनी सहकारी बँकेने या क्षेत्रात केलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन  व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने असोसिएशन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराचे बोलत होते.” यावेळी प्रशिक्षक सीए अभय भाटे  , उद्योजक राजेश मालपाणी, असोसिएशनचे अध्यक्ष गिरीशजी घैसास ,बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी व संचालक तसेच अहमदनगर जिल्ह्यातून आलेले सर्व सहकारी बँकांचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन, संचालक, सीईओ, आधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना  डॉ तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार हा कामकाज करत असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा हा सहकारी पॅटर्न देशासाठी दिशादर्शक ठरला आहे अमृतवाहिनी बँकेने सातत्याने सर्वसामान्यांना मदत केली असून विविध ऑनलाईन प्रणालींचा कौतुकास्पद वापर केला आहे. बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांना होणारी मदत अत्यंत महत्त्वाची आहे रिझर्व बँकेचे नियम दिवसेंदिवस अत्यंत कठीण होत चालली असून इंटरनल ऑडिट हे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे त्यासाठी घेतलेले चर्चासत्र सर्व बँकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर सीए अभय भाटे म्हणाले की बँकिंग हा विषय दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे गरजेचे आहे. बँकांच्या ऑडिट प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक स्थितीची ऑडिट केल्याने त्याच्या जीवनात समृद्धी निर्माण होणार आहे यावेळी गिरीश घैसास, राजेश मालपाणी यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले बँकेचे सीईओ अंबादास वाणी यांनी सूत्रसंचालन केले व बँकेचे संचालक श्रीकांत गिरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!