प्रा. एस. झेड. देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एस. झेड. देशमुख यांना जाहीर झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सहस्त्रबुद्धे यांनी दिली. गेल्या १२ वर्षांपासून साहित्य, संस्कृती व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना या मान्यताप्राप्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते आहे. २०२३ वर्षाचे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कारांमध्ये मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे ज्येष्ठ कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. जयवंत कुलकर्णी यांना ‘प्रज्ञावंत गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या जीएसटी सहआयुक्त व सिद्धहस्त लेखिका स्वाती काळे यांना ‘शारदा दुर्गा स्त्री शक्ती गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘महर्षी लोपामुद्रा सार्थक जीवनगौरव पुरस्कार’ नगरच्या स्वरानंद प्रबोधिनीच्या संचालिका श्रीमती मधुसूदन बोपर्डीकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. हे पुरस्कार येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे प्राचार्य अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!