डॉ.अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी महानाट्यात स्थानिक कलाकारांना संधी
25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ऑडिशन..
संगमनेर / लोकवेध live न्यूज
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि श्री.महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी या भव्यदिव्य महानाट्याचे आयोजन संगमनेर येथे 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2024 रोजी, संध्याकाळी 6.00 वाजता, जाणता राजा मैदान, संगमनेर येथे आयोजन केले आहे.
या महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराज भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कविकलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग या असणार आहे.
तडाखेबाज संवाद, 120 फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती,घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, 26 फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत 150 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग या महानाट्यात आहे.
तरी सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
रामदास तांबडे
9960042374 अभिजित पवार
99752 64772
जयेंद्र दुधे 9730468484
संपर्क साधावा असे आवाहन लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात गौरव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
